SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'द लिजंड' राज कपूर यांच्या स्मृतींना उजाळा; कोल्हापुरातील स्मारकाच्या सुशोभीकरणाची मागणीजागतिक पाळीव प्राणी दिवस: प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव"जयसिंगपूरात साकारणारी भीमसृष्टी प्रेरणादायी ठरेल"जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहता कामा नये : आमदार राजेश क्षीरसागरकोल्हापूर महानगरपालिका : लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार १३ वारसांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते नियुक्तीपत्रेस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त ८ रोड स्विपिंग मशिन्सचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पणदुर्गराज रायगडावर ५ व ६ जून रोजी रंगणार 'शिवराज्याभिषेक सोहळा': ऐतिहासिक स्मृतींना उजाळाकोल्हापुरात 'महाराष्ट्रधर्म' शिबिराचे आयोजन: पुरोगामी विचारांच्या संवर्धनासाठी जनजागरणाची हाकप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी मेधावी ठरली राज्यस्तरीय इंग्रजी वाचक स्पर्धेत अव्वल32 गरजू बाल हृदय रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार

जाहिरात

 

'द लिजंड' राज कपूर यांच्या स्मृतींना उजाळा; कोल्हापुरातील स्मारकाच्या सुशोभीकरणाची मागणी

schedule02 Jun 26 person by visibility 110 categoryसामाजिक

कोल्हापूर: भारतीय चित्रपटसृष्टीचे 'द लिजंड' स्वर्गीय राज कपूर यांचा ३८ वा स्मृतिदिन जुना वाशी नाका येथील त्यांच्या पुतळा परिसरात 'कलासक्त' परिवाराच्या वतीने अत्यंत आदराने साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मात्र, त्याच वेळी येथील त्यांच्या स्मारकाची झालेली दुरावस्था समोर आली असून, तातडीने सुशोभीकरण करण्याची मागणी कलासक्त परिवाराने लावून धरली आहे.


स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास कोल्हापूरचे उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक प्रसाद चव्हाण, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, प्रतीक पाटील यांच्यासह कलासक्त परिवाराचे दिनकर साळुंखे, नीलिमा काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी किशोर घाटगे यांनी राज कपूर यांच्या पुतळ्याचा इतिहास सांगताना सांगितले की, कोल्हापुरात उभारलेला हा देशातील एकमेव पुतळा असून त्याचे उद्घाटन खुद्द शशी कपूर यांनी केले होते. अनेक वर्षांपासून कलासक्त परिवार जयंती व पुण्यतिथीच्या माध्यमातून राज कपूर यांच्या आठवणी जपत आहे.
दरम्यान, महापालिकेने महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीप्रमाणेच स्वर्गीय राज कपूर यांचाही स्मृती दिन अधिकृतपणे साजरा करावा, अशी मागणी करत स्मारकाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. उपमहापौर अक्षय जरग यांनी या प्रस्तावावर सकारात्मक आणि सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात कलासक्त परिवाराच्या वतीने लवकरच राज कपूर यांच्या गाण्यांवर आधारित १०० गाण्यांचा 'वर्ल्ड रेकॉर्ड' कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची घोषणा दिनकर साळुंखे यांनी केली. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी लालासाहेब गायकवाड, डॉ. देवेंद्र रासकर, मोहन लोंढे, अमृता गलांडे, सुचित्रा खटावकर, राहुल मुचेंडेकर, महेश भंडारी, रवींद्र मिस्त्री, भगवान गायकवाड, युवराज जाधव, शिवराज सावंत, अनिल पाटील, सागर ठाणेकर, राजेंद्र मकोटे यांच्यासह अनेक चाहते व नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes