लोकशाही दिनात 138 अर्ज दाखल
schedule03 Nov 25 person by visibility 63 categoryराज्य
कोल्हापूर : महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या लोकशाही दिनात एकूण 138 अर्ज दाखल झाले, यापैकी महसूल विभाग -39, कोल्हापूर महानगरपालिका- 15, जिल्हा परिषद - 20, पोलीस विभाग- 12 तर इतर विभागांचे 52 अर्ज होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना लोकशाही दिनात आलेल्या नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे,वैद्यकीय अधीक्षक (सीपीआर) डॉ. भूषण मिरजे यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.