माझं कोल्हापूर - कुष्ठरोगमुक्त कोल्हापूरला प्राधान्य द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule03 Nov 25 person by visibility 50 categoryराज्य
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सन 2027 पर्यंत कुष्ठरोग हा शुन्यावर आणायचा आहे.त्यासाठी बाधितांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच आरोग्य विभागाने, 'माझं कोल्हापूर - कुष्ठरोग मुक्त कोल्हापूर ' या मोहिमेतंर्गत कार्यरत राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले .
17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत आरोग्य विभागातर्फे,कृष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी म्हणाले,जिल्ह्यात या कालावधीत सर्वेक्षणातून एक ही घर सुटता कामा नये.तसेच संशयित रुग्णांनी अजिबात घाबरू नये, या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व तालुक्यात प्रशिक्षण आवश्यक असून या प्रशिक्षणासाठी सर्वांची शंभर टक्के उपस्थिती आवश्यक आहे. या कामी जिल्ह्यात 2684 टीम सर्वेक्षणासाठी कार्यरत राहणार आहेत.हे सर्वेक्षण दोन सदस्यांच्या टीमने करायचे आहे.संबंधित टीमचे आयडेंटिफिकेशन आरोग्य विभागाने करावे अशी सूचनाही त्यांनी केली.
प्रारंभी कुष्ठरोग आरोग्य सेवेच्या सहाय्यक संचालक डॉ.हेमलता पालेकर यांनी जिल्ह्यातील कृष्ठरोग रुग्णांचा आढावा सादर केला.या आढावा बैठकीसाठी माता बाल संगोपन अधिकारी डॉ . फारूक देसाई,डीएनटी वैद्यकीय अधिकारी डॉ.शोभा भोई,पर्यवेक्षीय नागरी कुष्ठरोग पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव शिंदे,सीपीआर रुग्णालयाच्या बाह्यसंपर्क अधिकारी डॉ रेश्मा पाटील यांच्यासह इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.