कोल्हापुरात मोटर वाहन कायदयांचे उल्लंघन करणाऱ्या २८९ वाहन चालकांवर कारवाई; २५९२००/- दंड वसूल
schedule03 Nov 25 person by visibility 168 categoryगुन्हे
कोल्हापूर : मोटर वाहन कायदयांचे उल्लंघन करणारे वाहन चालकांवर शहर वाहतुक नियंत्रण कोल्हापूर शाखेतर्फे २८९ वाहन चालकांचेवर कारवाई करुन त्यांचेकडून २५९२००/- इतका दंड आकारण्यात आला.
शहर वाहतुक नियंत्रण शाखा कोल्हापूर मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे वाहनधारकांवर शहर वाहतुक नियंत्रण शाखा, कोल्हापूर वतीने कोल्हापूर शहरात मलबार हॉटेल चौक, खानविलकर पेट्रोल पंप, गोखले कॉलेज चौक, ताराराणी सिंग्नल चौक, विवेकानंद कॉलेज परिसर, सायबर चौक या ठिकाणी सकाळी ०९.०० ते ११.०० या कालावधीत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना नेमून विशेष मोहिमेद्वारे मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली.
तरी शहर वाहतूक शाखा, कोल्हापूरचे वतीने सर्व नागरिक / वाहनचालक यांना आवाहन करण्यात येते की, मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे वाहनधारकावर कारवाईची मोहीम पुढील काळातही व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. तरी वाहनचालकांनी कायदेशीर कारवाई टाळावी.
ही कारवाई पोलीस अधीक्षक , अपर पोलीस अधीक्षक यांनी दिले सुचने प्रमाणे व मार्गदर्शनाखाली श्रीमती प्रिया पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग व शहर वाहतुक शाखेकडील पो.नि. नंदकुमार मोरे, यांचे निरीक्षणाखाली करण्यात आली.