SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रंकाळा परिसरात महापालिकेची कारवाई; १४ भटकी गाढवे जप्त‘फोरसीइंग कोल्हापूर २०३५’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये व्यासपीठकोल्हापूर आगारात नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ ’ बस दाखल; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते लोकार्पण१५५ वर्षांची गौरवशाली परंपरा: मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर-९ बास्केटबॉल स्पर्धेचा दिमाखात प्रारंभ शिरोळ तालुक्यातील रस्ते विकासाला प्राधान्य : आमदार यड्रावकरमांगनूर येथील रस्ता गावाबाहेरून काढाकेडीसीसी बँक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत राज्यात अग्रभागी मद्रास दिवस: दक्षिण भारताच्या सांस्कृतिक राजधानीचा ऐतिहासिक प्रवासकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदान

जाहिरात

 

रंकाळा परिसरात महापालिकेची कारवाई; १४ भटकी गाढवे जप्त

schedule22 Aug 26 person by visibility 141 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : रंकाळा परिसर तसेच मुख्य रस्त्यांवर भटक्या जनावरांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रंकाळा परिसरात भटकणारी १४ गाढवे जप्त करण्यात आली.

फुलेवाडी मार्गे दत्त मंगल कार्यालयाच्या बाजूने ही गाढवे रंकाळा परिसरात दाखल झाली होती. रस्त्यावर मोठ्या संख्येने गाढवे भटकत असल्याने वाहनधारक तसेच स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नागरिक तसेच नगरसेवकांकडून महापालिकेकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई केली. विशेष मोहिमेदरम्यान सर्व १४ भटकी गाढवे जप्त करण्यात आली.
ही कारवाई आरोग्य निरीक्षक अनिकेत बावडेकर, ऋषिकेश सरनाईक व गीता लखन आरोग्य विभागातील मुकादम, कर्मचारी व ॲनिमल कॅचर यांच्या पथकाने केली.
महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी भटक्या जनावरांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतुकीला निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरू ठेवण्यात येणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes