SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदानसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक उद्योजक दिवस उत्साहात साजराकोल्हापूर महापालिका नगरसेविका ॲड. मानसी लोळगे यांचा गंभीर आरोप; तानाजी जाधवविरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारडी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उद्या शनिवारी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनडी.वाय.पी. ग्रुपतर्फे महानगरपालिकेला १५५० एलईडी दिव्यांची भेटवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्स; ऊस, गोकुळ आणि 'शक्तिपीठ'बाबत रोखठोक भूमिकासीपीआर तो सिर्फ झांकी है, शेंडा पार्क अभी बाकी हैमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी कोल्हापुरात नागरिकांची निवेदने स्वीकारणारपाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवाचा संदेश देत महावॉकेथॉन रॅली संपन्नकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.73 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 32.3 मिमी पावसाची नोंद

जाहिरात

 

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदान

schedule21 Aug 26 person by visibility 156 categoryउद्योग

इचलकरंजी : अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे साखर उद्याेगाच्या प्रगतीसाठी दिलेले माेलाचे याेगदान, उच्च दर्जाच्या साखरेच्या उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरी तसेच उत्पादन व कार्यपद्धतीतील उल्लेखनीय कार्यक्षमता यांची दखल घेऊन दि शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट सब असाेसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला.


संस्थेच्या 84 व्या वार्षिक अधिवेशनामध्ये गाेव्याचे मुख्यमंत्री प्रमाेद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी असाेसिएशनचे अध्यक्ष संजय अवस्थी उपस्थित हाेते.

 कारखान्याच्या वतीने हा पुरस्कार व्हा. चेअरमन बाबासाे चाैगुले, संचालक सुरज बेडगे, कार्यकारी संचालक मनाेहर जाेशी आणि कारखान्याच्या अधिकाऱ्यनी स्विकारला.
देशातील साखर व संलग्न उत्पादनांची गुणवत्ता, उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी किायतशीर व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी ही संस्था सातत्याने प्रयत्नशील असते. साखर उद्याेगाच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय याेगदान देणारे उद्याेगसमूह, व्यावसायिक, तज्ञ व संस्थांचा गाैरव करण्यासाठी दि शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट सब असाेसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येताे.

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास मिळालेला हा पुरस्कार देशातील साखर उद्याेगाच्या तांत्रिक प्रगतीस आणि कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांनी व्यक्त केला. या पुरस्काराबद्दल कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद-शेतकरी, संचालक, ऊस ताेडणी मजूर-वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी-कर्मचारी-कामगार यांचा माेलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे आणि संचालक आमदार राहूल आवाडे यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes