डीएसओ बुद्धिबळ निवड स्पर्धेत केन चेस अकॅडमीचा ऐतिहासिक यश; १५ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
schedule30 Sep 26 person by visibility 66 categoryक्रीडा
इचलकरंजी : शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड स्पर्धा (DSO) २०२६ मध्ये केन चेस अकॅडमी, इचलकरंजी व जयसिंगपूर शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण १५ विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय (Zonal) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
इचलकरंजी मनपा शालेय गटातून (१० विद्यार्थी) निवड झालेल्यांमध्ये: १९ वर्ष खालील मुली गट- मुली: कांबळे जानवी - तिसरा क्रमांक
- १९ वर्ष खालील गट मुले: अथर्व सुतार - पहिला क्रमांक
- १७वर्ष खालील गट मुले: तावरे अथर्व - पहिला क्रमांक, रुद्र माने - चौथा क्रमांक
१७ वर्ष खालील मुली गट- मुली: कल्याणी धूमाळ -दुसरा क्रमांक
- १४ वर्ष खालील गट मुले: सिद्धेश वड्डे - दुसरा क्रमांक , आदित्य ठाकूर - तिसरा क्रमांक , श्रीवर्धन नलवडे - पाचवा क्रमांक .
- १४ वर्ष खालील मुली गट : समृद्धी खतोड - दुसरा क्रमांक , धनश्री पोरलेकर - चौथा क्रमांक.
कोल्हापूर जिल्हा ग्रामीण गटातून (५ विद्यार्थिनी) निवड झालेल्यांमध्ये:
- १४ वर्ष खालील मुली गट: सिद्धी कर्वे - पहिला क्रमांक , स्वरा पाटणी -दुसरा क्रमांक, मृणाल पांडव - चौथा क्रमांक
- १७ वर्ष खालील मुली गट मुली: सिद्धी बुबणे - दुसरा क्र.
- १९ वर्ष खालील मुली गट मुली: तन्वी पाटील - पाचवा क्र.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना केन चेस अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक *रोहित पोळ व प्रशिक्षिका रेश्मा नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
आज इचलकरंजी येथे अकॅडमीतर्फे या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन समारंभ व पुढील Zonal स्पर्धेच्या तयारीसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल इचलकरंजी व जयसिंगपूर परिसरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.