SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांचा राहावा : आमदार सतेज पाटीलतारदाळ येथे वाहनांच्या फिटनेस तपासणीची सुविधा सुरू : आमदार यड्रावकर डीएसओ बुद्धिबळ निवड स्पर्धेत केन चेस अकॅडमीचा ऐतिहासिक यश; १५ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवडडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपश्री शाहू सह. दूध व्यव. संस्था मर्या. नागांवची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; उत्कृष्ट दूध उत्पादकांचा गौरव!कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला 'खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा'; रोख बक्षीसांसह ४१ आकर्षक पारितोषिके जिंकण्याची सुवर्णसंधी!दुष्काळाच्या छायेत संवेदनशील निर्णय! भागीरथी संस्थेची 'झिम्मा फुगडी' स्पर्धा रद्द; बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार“स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा!” प्राध्यापक नितीन बानगुडे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेशशामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावोगावी मोफत आरोग्य शिबिरेजीवनगौरव पुरस्काराबद्दल कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांचा यड्रावकर कुटुंबाकडून सत्कार

जाहिरात

 

तारदाळ येथे वाहनांच्या फिटनेस तपासणीची सुविधा सुरू : आमदार यड्रावकर

schedule30 Sep 26 person by visibility 70 categoryराज्य

◼️इचलकरंजी- शिरोळमधील वाहनधारकांची बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण; १ ऑक्टोबरपासून चाचणी

जयसिंगपूर :
इचलकरंजी व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांची बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण झाली असून, तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल इंडस्ट्रियल पार्कमधील चाचणी पथावर १ ऑक्टोबर २०२६ पासून हलकी (LMV) तसेच अवजड (HMV) अशा सर्व प्रकारच्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची (Fitness Certificate) तपासणी करता येणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

तारदाळ येथील स्थानिक चाचणी पथ नियमितपणे सुरू करण्याची मागणी होत होती या मागणीचा परिवहन विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर तारदाळ येथील चाचणी पथावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या फिटनेस तपासणीस मान्यता मिळाली आहे.

यापूर्वी इचलकरंजी व शिरोळ परिसरातील वाहनधारकांना फिटनेस तपासणीसाठी कोल्हापूर येथील मोरेवाडी चाचणी पथावर जावे लागत होते. त्यामुळे सुमारे ६० ते ८० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास, तसेच वेळ, इंधन व श्रमाचा खर्च वाहनधारकांना सहन करावा लागत होता. आता तारदाळ येथेच ही सुविधा उपलब्ध झाल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

या सुविधेमुळे स्थानिक वाहतूकदार, व्यावसायिक व व्यापाऱ्यांचा वेळ आणि इंधनावरील खर्च वाचणार असून, इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगासह औद्योगिक मालाची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. परिवहन विभागाच्या या निर्णयाचे वाहनधारक व वाहतूकदारांतून स्वागत होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes