SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दुष्काळाच्या छायेत संवेदनशील निर्णय! भागीरथी संस्थेची 'झिम्मा फुगडी' स्पर्धा रद्द; बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार“स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा!” प्राध्यापक नितीन बानगुडे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेशशामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावोगावी मोफत आरोग्य शिबिरेजीवनगौरव पुरस्काराबद्दल कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांचा यड्रावकर कुटुंबाकडून सत्कारआंतरराष्ट्रीय अनुवाद दिन: संस्कृतींना जोडणारा भाषिक सेतूगेल्या ५ वर्षांच्या काटकसरी कारभारावर ठरावधारकांचा विश्वास : आमदार सतेज पाटीलगोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीरच्या राजकारणात नवा ट्विस्टकसबा बावडा येथे 'कबाड से जुगाड' बाल विद्यार्थी कार्यशाळा उत्साहात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा : राज्यपाल जिष्णु देव वर्माराज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

जाहिरात

 

दुष्काळाच्या छायेत संवेदनशील निर्णय! भागीरथी संस्थेची 'झिम्मा फुगडी' स्पर्धा रद्द; बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार

schedule30 Sep 26 person by visibility 93 categoryसामाजिक

कोल्हापूर  : राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे सामाजिक भान राखत कोल्हापूरच्या भागीरथी संस्थेने गडहिंग्लज येथे ७ ऑक्टोबर रोजी होणारी महिलांची 'झिम्मा फुगडी' स्पर्धा यंदा रद्द केली आहे. शेतकरी वर्ग संकटात असताना आनंदोत्सव साजरा करणे योग्य नाही, या भावनेतून स्पर्धेचा संपूर्ण खर्च आणि बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी जाहीर केला आहे.

भागीरथी संस्थेच्या वतीने यावर्षी गडहिंग्लज मध्ये 7 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले होते. दरवर्षी भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेला महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. यावर्षीच्या गडहिंग्लज मधील स्पर्धेलाही महिलांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी केली होती. मात्र सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे.

 अशा परिस्थितीत भागीरथी संस्थेने सामाजिक भान ठेवून, गडहिंग्लज मध्ये होणारी झिम्मा फुगडी स्पर्धा यंदा रद्द केली आहे. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग दुष्काळामुळे चिंताग्रस्त झाला आहे. अशावेळी महिलांच्या झिम्मा फुगडी स्पर्धा घेणे योग्य होणार नाही, या भावनेतून ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. 

या स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च आणि बक्षिसांची रक्कम, मुख्यमंत्री सहायता निधी साठी दिली जाईल, अशी माहिती भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा   अरुंधती महाडिक यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes