शिवाजी विद्यापीठात बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती
schedule15 Nov 25 person by visibility 50 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्रामार्फत आज बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली.
कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांच्या हस्ते प्रशासकीय भवन इमारतीमध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी उपकुलसचिव गजानन पळसे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, क्रीडा व शारिरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या सहाय्यक संचालक डॉ. नीलांबरी जगताप, इतिहास अधिविभागाचे डॉ. दत्तात्रय मचाले, डॉ. उमाकांत हत्तीकट यांच्यासह विद्यार्थी विकास विभाग, इतिहास अधिविभाग येथील विद्यार्थी व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक उपस्थित होते.