गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीतील पंचगंगा नदीपुल येथे तलवारी घेऊन फिरणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू
schedule15 Nov 25 person by visibility 68 categoryगुन्हे
कोल्हापूर : गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीतील पंचगंगा नदीपुल येथे हातात तलवारी घेऊन दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या चौघांना पकडुन त्यांचेकडुन ३ तलवारी व १ लोखंडी एडका जप्त केला. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर व त्यांचे सोबतचा स्टाफ यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्हयात सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी हत्यार व शस्त्रे तसेच इतर वर्तन करण्यास मनाई आहे.
रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती भारत सरकार यांचे दौऱ्याच्या अनुषंगाने पंचगंगापुल येथुन जात असताना पुलाशेजारून ६ इसम आपल्या हातात तलवारी व एडके घेउन जात असताना दिसून आले. त्यावेळी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून आम्ही त्यांना आमच्याकडे पर्याप्त पोलीस बळ नसताना देखील थांबविले व आमचेकडील पोलीस स्टाफ पो कॉ २५८१ सुभाष पाटील व पो हे कॉ ४३३ राहुल मस्के (चालक) यांनी पकडले.
त्यावेळी त्या सहा इसमांचे पैकी दोन इसम तेथुन पळुन गेले. आम्ही त्या ४ इसमांना पकडुन ठेवले त्यांचेकडील ३ लोखंडी तलवारी व एक लोखंडी एडका असे काढुन घेतले. त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) नटवर मोहन सोळंकी, वय २८, २) गोपाल शिवा सोळंकी यांच्यासह दोन अल्पवयीन बालक अशी असलेचे सांगीतले. त्यानंतर आम्ही गांधीनगर पोलीस ठाणेकडील पोलीस स्टाफ बोलावुन घेऊन त्यांचे बाबत योग्यती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिला.
त्याप्रमाणे गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर २ संशयीत यांचा शोध सूरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार , यांचे मार्गदर्शना खाली सदरची कारवाई करण्यात आली आहे.