SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शेती केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार : उपमुख्यमंत्री अजित पवारजग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाशिक येथे कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकसकाळ आणि घोडावत विद्यापीठांतर्गत 'समर युथ समिट' ३, ४ जून रोजी कोल्हापुरात‘गोकुळ’ मार्फत सी.पी.आर.रुग्णालयात रुग्णांना व नातेवाईकांना मोफत दूध वाटप...शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पन्न वाढवा, सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या, कृषी विज्ञान केंद्रांशी सतत संपर्क ठेवा; खा. धनंजय महाडिक यांनी शेतकऱ्यांशी साधला संवादकिमान 10 जूनपर्यंत पावसात घट; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नयेपहलगाम दहशतवादी हल्ला : राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीतघरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देशऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावशेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील उत्पन्न वाढवावी

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून 1 हजार 500 क्युसेक विसर्ग

schedule12 Sep 24 person by visibility 280 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.14 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील- शेणगाव, ताम्रपर्णी नदीवरील -चंदगड, भोगावती नदीवरील- खडक कोगे दुधगंगा नदीवरील -दत्तवाड, सिध्दनेर्ली व बाचणी, वारणा नदीवरील - चिंचोली, हिरण्यकेशी नदीवरील- ऐनापूर व साळगाव, कासारी नदीवरील - यवलूज असे एकूण 17 बंधारे पाण्याखाली आहेत.

▪️आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.
राधानगरी 8.14 टीमसी, तुळशी 3.47 टीएमसी, वारणा 34.16 टीएमसी, दूधगंगा 23.46 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.67 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.81 टीमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला - 0.48 व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

आज सकाळी 7 च्या अहवालानुसार बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 17 फूट, सुर्वे 18.11 फूट, रुई 46.3 फूट, इचलकरंजी 43.6 फूट, तेरवाड 42 फूट, शिरोळ 33 फूट, नृसिंहवाडी 31 फूट, राजापूर 20.10 फूट तर नजीकच्या सांगली 12.6 फूट व अंकली 13.6 फूट अशी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes