नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये झालाकाठी सदरमधील छत्रकांडा भागात बसचा भीषण अपघात झाला असून आज सकाळी शनिवारी एक बस थेट तलावात पडल्याने तीन मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघातात मृत झालेले लोक हे पिरोजपूरच्या भंडारिया उपजिल्हा आणि झलकाठीच्या राजापूर भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही बस पिरोजपूर येथील भंडारिया येथून सकाळी 9 वाजता निघाली होती. त्यानंतर बसबारिशाल खुलना महामार्गावरील छत्रकांडा येथे सकाळी 10 वाजता येताच रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात पडली आणि हा अपघात झाला.
तसेच बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने तळ्यात पडल्यानंतर बस पाण्यात बुडाली. बस पडल्यानंतर काही प्रवासी पोहून बाहेर आले आणि आपला जीव वाचवला मात्र यामध्ये 17 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 35 जण जखमी झाले आहेत स्थानिक प्रशासन नागरिकांनी बचाव कार्यामध्ये सहभाग घेतला.