कृष्णा स्नेह संवर्धिनी संस्था - राष्ट्र सेविका समिती आयोजित महिला भजन स्पर्धेत १८ संघ सहभागी; स्वराजंली विजेते
schedule28 Mar 25 person by visibility 244 categoryसामाजिक

कोल्हापुर : करवीर नगर वाचन मंदिरात कृष्णा स्नेह संवर्धिनी आणि राष्ट्रसेसेविका समितीच्या संयुक्त संत मिराबाईंची भजने हा विषय घेऊन कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यासाठी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . या भजन स्पर्धेत शहर आणि जिल्हयातील एकूण 18 भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेचे परीक्षण संगीत विशारद मुग्धा देसाई.. आणि स्मिता गोसावी यांनी केले होते . प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अनघा नाईक यांनी प्रास्ताविक केले .
सादरीकरणासाठी प्रत्येक भजनी मंडळांना १० मी . वेळ देण्यात आला होता. प्रत्येक मंडळाने संत मीराबाईंचे एक भजन आणि एक गवळण सादर केली. स्पर्धेचे नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करून केलेल्या परिक्षणानुसार खालील भजनी मंडळांनी यश संपादन केले .
१ ) प्रथम क्रमांक : -स्वरांजली भजनी मंडळ,राजोपाध्येनगर
२ ) द्वितीयक्रमांक विभागून देण्यात आला :- १ ) स्वरदा भजनी मंडळ, राजारामपुरी
२ ) स्वामिनी भजनी मंडळ, सम्राटनगर
तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला : -१ ) शांभवी भजनी मंडळ, ब्रह्मेश्वर बाग
२ ) निरुपमा खेबुडकर भजनी मंडळ
याशिवाय उत्तेजनार्थ विघ्नहर्ता भजनी मंडळ आणि राधाकृष्ण भजनी मंडळ, नागाळा पार्क यांना देण्यात आले .
सर्व भजनी मंडळांनी अतिशय उत्तम सादरीकरण केले प्रत्येक सहभागी भगिनींना सहभाग प्रशस्तीपत्र दिले.
कार्यक्रमाचे बक्षिस वितरण संस्थेच्या देणगीदार डाॅ. प्रा.प्रियांका कुलकर्णी. व दोन्ही परीक्षक आणि संस्थेच्या सचिव प्राची जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन प्राची जोशी यांनी केले . सूत्रसंचलन कविता जोशी व अनघा नाईक यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्र सेविका समितीच्या कोल्हापूर उत्तर , दाक्षिण व शहरच्या कार्यवाहिका डॉ . मुजुमदार , अनघा नाईक , प्रज्ञा परांजपे तसेच सर्व सेविकांनी अथक परिश्रम घेतले . त्यांना विभाग संपर्क प्रमुख मेधा ताई जोशी यांचे मार्गदर्शन लाभले . कार्यक्रमाची सांगता 'जाग भगिनी मातृशक्ती जाग तू सखे ' या देशभक्तीपर प्रेरणा गीताने झाली . आगामी काळात व्यापक प्रमाणात या स्पर्धा आयोजित करण्याचा निर्धारित यावेळी व्यक्त करण्यात आला .