SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगरातील 3 व्यापाऱ्यांवर 15 हजारांचा दंड ; 230 किलो प्लास्टिकचा साठा जप्त"दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६" उत्साहात संपन्न; फाईट क्लब संघाला प्रथम पारितोषिककोल्हापूर : थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेसला सीलकोल्हापूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद : गृहराज्यमंत्री योगेश कदमसद्भावना दिन: राष्ट्रीय एकात्मता आणि सलोख्याचा संदेशमहास्ट्राईड' प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथमआपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया स्थगितः नव्याने जाहिरनामा काढण्यात येणारगरुड मंडपाच्या सिलिंग पर्यंतची कामे नवरात्री पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ विजय राठोडकोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कारअभ्यासाचे नियोजन, सातत्य आणि वेळेचे व्यवस्थापन स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे: जयश्री गायकवाड

जाहिरात

 

प्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगरातील 3 व्यापाऱ्यांवर 15 हजारांचा दंड ; 230 किलो प्लास्टिकचा साठा जप्त

schedule20 Aug 26 person by visibility 118 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या हद्दीतील गांधीनगर परिसरातील दुकानांची या पथकामार्फत तपासणी करण्यात आली. यामध्ये सदगुरु पॅकेजींग, आनंद ट्रेडर्स व अवतार ट्रेडर्स या दुकानात सुमारे 230 किलो वजनाचा अंदाजे रु.75 हजार किंमतीचा प्लास्टिकचा साठा आढळून आला. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यावर प्रत्येकी ५000 रुपये प्रमाणे रु.15 हजारांचा दंड करुन तो वसूल करण्यात आला. 

प्लास्टिकचा संपूर्ण साठाही जप्त करण्यात आला. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेने गेल्या दहा दिवसांपासून या पथकामार्फत शहरात प्लास्टिकमुक्ती आणि स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम सुरू केली असून नागरिक व व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीतच द्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे किंवा रस्ते व नाल्यांमध्ये कचरा टाकल्यास संबंधित कायदे व नियमांनुसार दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes