"दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६" उत्साहात संपन्न; फाईट क्लब संघाला प्रथम पारितोषिक
schedule20 Aug 26 person by visibility 142 categoryक्रीडा
इचलकरंजी : मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी (MAI) व केन चेस अकॅडमी, इचलकरंजी तर्फे आयोजित "दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६ ही बुद्धिबळ स्पर्धा दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी स्व. सौ. प्रतिभा बाळासाहेब लांडे सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
चेस असोसिएशन कोल्हापूर व चेस असोसिएशन इचलकरंजी यांच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 50 संघांनी सहभाग घेतला.
विजेते संघ:
1. प्रथम - रु.5,000 + चषक : फाईट क्लब - 12 सामना गुण +22 गुण.
जयेश मालपाणी,धैर्यशील सरनोबत, सोहम चाळके, तन्मय पवार
2. द्वितीय - रु.3,000 + चषक : मास्टरमाइंड मंडळी - 12. सामना गुण +21.5 गुण (प्रणव मोरे,सर्वेश
पोतदार ,व्यंकटेश खाडेपाटील,अरीन कुलकर्णी
3. तृतीय - रु.2,000 + चषक : तावडे बुद्धिबळ अकादमी - 11 सामना गुण
,(मुधले प्रज्वल, निकम रवींद्र, लोटके प्रथमेश, राहुल सामानगडकर)
4. चतुर्थ - रु.1,000 + चषक: केन किंग्स - 11 गुण(कोळी आदित्य, अथर्व तावरे, रुद्र माने, करण दबडे)
▪️विशेष पारितोषिके:
1. सर्वोत्तम महिला संघ - ₹500 + चषक*: केन क्वीन्स - (सिद्धी कर्वे, सिद्धी बुबणे, रेश्मा नलवडे, पांडव श्रुती)
2. सर्वोत्तम १० वर्ष खालील शालेय संघ - ₹500 + चषक : समर्थ विद्यामंदिर इचलकरंजी
(सोनल कुंभार, शिवांश सुतार, बाबर वल्लभ, मुरदुंदे प्रसन्न )
3. सर्वोत्तम १६ वर्ष खालील शालेय संघ - ₹500 + चषक*: डीकेटीई डिफेन्स वॉरियर्स U16
(निकम निरंजन, रावल वरद, पाटील यशराज, निकम अथर्व)
4. सर्वोत्तम डॉक्टर संघ - ₹500 + चषक*: डीवायपी शस्त्रक्रिया योद्धे
(कुलकर्णी कौस्तुभ, खोत श्रेयश, पाटील हरीश, विखाणी राहिल)
क्र. 5. चेस वॉरियर कोल्हापूर (रोख रक्कम व ट्रॉफी) , क्र.6.चेस डायमंड्स कोल्हापूर(रोख रक्कम व ट्रॉफी), क्र.7.विझार्ड्स चेसक्लब कोल्हापूर(रोख रक्कम व ट्रॉफी),क्र.8.सुपर सोल्जर्स फोर एस(ट्रॉफी),क्र.9. ग्रेट इंडियन(ट्रॉफी).क्र.10.केन नाइट्स (ट्रॉफी)
बोर्ड पारितोषिके - एकूण 12 पदके:
* बोर्ड1*: 1. मालपानी जयेश -फाईट क्लब , 2. सरिकर संतोष - सुपर सोल्जर्स फोर एस , 3. कांबळे संतोष - बुद्धिबळ योद्धे कोल्हापूर
*
बोर्ड 2: 1. सोनी विवान - विझार्ड्स चेस क्लब , 2. निकम रवींद्र - तावडे बुद्धिबळ अकादमी, 3. सिद्धेश विनायक वड्डे - केन नाइट्स
बोर्ड 3 : 1. केणे मैथिली -केन ओपनिंग , 2. खाडे-पाटील वेंकटेश - मास्टरमाइंड मंडळी, 3. रुद्र संदीप माने - केन किंग्स
बोर्ड 4: 1. तनमय नंदराज पवार - फाईट क्लब, 2. ठक्कर वंशिल विनय -बुद्धिबळ डायमंड 3. दबडे करण - केन किंग्स *पारितोषिक वितरण:*
पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष डॉ. नितीन जाधव, सचिव डॉ. अमित देशमुख, खजिनदार डॉ. उत्तम माळी, क्रीडा समिती अध्यक्ष डॉ. श्रीधर जाधव, केन एंटरप्रायझेस चे व्यवस्थापन संचालक निकुंज बगडिया, सारिका बांगड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केन चेस अकॅडमीचे प्रोप्रायटर व मुख्य प्रशिक्षक फिडे डी.आय. रोहित पोळ यांनी केले.
वरिष्ठ राष्ट्रीय पंच आरती मोदी, रोहित पोळ, दीपक वायचल,राज्य पंच विजय सलगर, महेश व्यापारी, नेहा हतलगे ,इंद्रजीत कर्वे यानी काम पाहिले
.
स्पर्धेसाठी एकूण ₹15,000 रोख रक्कम, 14 चषक व 12 पदके देण्यात आली.