केआयटी कॉलेजमध्ये २६ गुणवंत विद्यार्थ्यांना 'मेरीट स्कॉलरशिप 'चे वितरण
schedule10 Feb 26 person by visibility 184 categoryराज्य
▪️लाखो रुपयांच्या स्कॉलरशिपद्वारे विद्यार्थ्यांचा गौरव.गुणवत्तेतील सातत्य हाच शिष्यवृत्तीचा निकष
कोल्हापूर : येथील नामांकित 'केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (प्रदत्त स्वायत्त)' तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या ' केआयटी मेरीट स्कॉलरशिप ' योजनेचा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावर्षी एकूण २६ विद्यार्थ्यांना त्यांच्या देदीप्यमान शैक्षणिक कामगिरीबद्दल या स्कॉलरशिपद्वारे गौरविण्यात आले.
ही स्कॉलरशिप पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर दिली जाते. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या MHT-CET २०२५ मधील गुणांवर, तर वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मागील वर्षाच्या शैक्षणिक कामगिरीवर (CGPA) करण्यात आली आहे. यावर्षीच्या एकूण २६ लाभार्थ्यांमध्ये १३ मुले आणि १३ मुलींचा समावेश आहे. गेल्या वर्षी लाभार्थी ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे यावर्षीही ही स्कॉलरशिप देण्यात आली आहे.
स्कॉलरशिप प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांची यादी
प्रथम वर्ष:
शांभवी धर्म, दक्ष आवळे, मुग्धा पोतदार, साक्षी राऊत , श्रीतेज बोडगिरे , हर्षवर्धन भोसले , संस्कार चव्हाण, शिवराज पाटील , मृणाल कापसे , रिया पाटील, राधा भोसले, आदित्य केसरकर , वरद पाटील आणि वेदिका पाटील
द्वितीय वर्ष
श्रीनिवास कुलकर्णी ,माही चाटे, कृष्णा अडागळे , सोनिया एरांडे , सूर्यकांत शिंदे , आदित्य जाधव, सुयश पाटील, वैदेही राठोड, रितिका पाटील आणि अनिकेत गवळी.
तृतीय वर्ष :
वेणू पाटील आणि आशिया तांबोळी
या उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली म्हणाले पुढील शैक्षणिक वर्षातही ही योजना कार्यरत राहणार असून गुणवान विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण व शैक्षणिक शुल्कातील १००% सवलत या दोन्हीचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षांनी केले आहे.या गुणवान विद्यार्थ्यांनी मोफत प्लेसमेंट प्रशिक्षण तसेच जापनीज भाषा शिकण्याच्या वर्गाचाही उपयोग स्वत:चे कौशल्य वाढवण्याच्या हेतूने करून घ्यावा असेही आवाहन अध्यक्ष साजिद हुदली यांनी केले आहे.
या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून संस्थेच्या माजी विद्यार्थिनी भारतीय नौदलातील अधिकारी सब.लेफ्टनंट ईशा शहा ,संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले, वरिष्ठ विश्वस्त सुनील कुलकर्णी, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी रजिस्ट्रार डॉ.दत्तात्रय साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिष्ठाता ॲडमिशन डॉ. महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रा.अमर टिकोळे, संग्राम पाटील,सुरज पाटील यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले.