SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कागल उरुसात भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अधिकाऱ्यांना सूचनाराजापूरवाडी येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीवारणा विद्यापीठाच्या पहिल्या युवा महोत्सवात कलागुणांचा जल्लोष!करवीर तालुक्यातील ५००० रेशन कार्ड धारकांचे बंद केलेले रेशन तात्काळ सुरू करा; शिवसेनेचे उचगाव येथे हुपरी-कोल्हापूर रस्ता रोको आंदोलनशिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्नशील राहतील :राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वासवीज पडून मृत्यू झालेल्या म्हाकवेतील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाखाची मदत.....महिला सक्षमीकरण हीच खऱ्या अर्थाने काळाची गरज : पुनमताई तोडकरगोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावागोकुळ’चा अध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा; १० नोव्हेंबरला होणार बहुप्रतिक्षित सभा!पालगड येथे वारणा दूध संघाच्या आधुनिक दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटन

जाहिरात

 

राजापूरवाडी येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणी

schedule02 Nov 26 person by visibility 105 categoryआरोग्य

◼️आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या १४ हजार ३९७ वर

कुरुंदवाड :  सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी (२ नोव्हेंबर) राजापूरवाडी येथे आयोजित आरोग्य शिबिरात १२५ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर १७२ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. अशा एकूण २९७ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. 
यापूर्वी राजापूर येथील शिबिरापर्यंत अभियानातील लाभार्थ्यांची एकूण संख्या १४ हजार १०० होती. त्यामध्ये राजापूरवाडी येथील आजच्या शिबिरातील २९७ लाभार्थ्यांची भर पडल्याने अभियानातील आजअखेरच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या १४ हजार ३९७ झाली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळीच निदान करणे आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

यावेळी पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, राजाराम गोते, आप्पासो मगदूम, वाल्मीक कोळी, अनिल कोळी, राजकुमार गोते, समीर दानवाडे, श्रीकांत कोळी, अरुण गोते, संतोष गोते यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes