कागल उरुसात भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
schedule02 Nov 26 person by visibility 146 categoryराज्य
◼️उरुस व दिपावली गर्दीच्या नियोजनासाठी अधिकाऱ्यांची व्यापक बैठक
कागल : कागल शहरात दीपावली व उरुसासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दीपावली व ग्रामदैवत श्री. गहिनीनाथ गैबीपीर उरुसाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक व्यवस्थेसह, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य विभाग यासह इतर सुविधांचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कागल शहरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांची व्यापक बैठक शासकीय विश्रामगृहामध्ये घेतली. या बैठकीला कागलच्या नगराध्यक्षा सविता प्रताप उर्फ भय्या माने, उपनगराध्यक्ष जयवंतराव व सर्व नगरसेवक, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता महेश पाटोळे, प्रकल्प संचालक श्री. सोनी, कागल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. जाधव, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल शहरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, त्यांना अडीअडचणींना तोंड द्यावे लागणार नाही यासाठी काटेकोर नियोजन करा. विशेषतः वाहतूक नियोजन व्यवस्थित करा. सूचना फलकासह रस्ते दुभाजक करा. त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांकरिता जे सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण आहे, ते तात्काळ येत्या आठ तारखेपर्यंत दिवाळीच्या अगोदर पूर्ण करा.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल शहरातून राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे कामही गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची विशेष काळजी घ्या. जिथे आवश्यकता असेल तिथे रस्ते दुभाजकांची व्यवस्था करा. माहितीसाठी सूचना फलक लावा. सेवा रस्त्यांवरील अडथळे दूर करून काम सुरू असलेल्या सेवा रस्त्यांचा तळातील भाग पक्का करा. कागल नगरपालिकेच्या अखत्यारीतील कागल शहरातील महामार्गाला जोडणाऱ्या ड्रेनेज लाईन पूर्ववत वाहत्या करा. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा अखंडित व सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घ्या व नियोजन करा.
पोलीस प्रशासनाला सूचना करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, दरवर्षी उरुसात होणाऱ्या गर्दीचा अंदाज पाहता राष्ट्रीय महामार्गावरील पंचायत समिती समोरील बोगदा, कागल बसस्थानकाजवळील बोगदा, आरटीओ चेकपोस्टकडील बोगदा या सर्व ठिकाणी वाहतुकीचे सुरळीत नियोजन करा. विशेषतः राष्ट्रीय महामार्गा व्यतिरिक्त शहरात येणाऱ्या सांगावकडून, निपाणीवेशीकडून व मूरगूडवरून येणाऱ्या वाहतुकीचेही योग्य नियोजन करा. कागल नगरपालिकेने पिण्याच्या पाण्यासह सार्वजनिक स्वच्छतेबाबत कटाक्षाने दक्ष राहून व्यवस्था करावी, अशा सूचनाही नगरपालिका प्रशासनाला दिल्या.
मंत्री मुश्रीफ यांनी सर्वच उपस्थित अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरभर फिरून पाहणी केली.
यावेळी कागलच्या नगराध्यक्षा सविता प्रताप उर्फ भय्या माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, गोकुळचे माजी संचालक युवराज पाटील (बापू), केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, नॅशनल हायवेचे एक्झिक्यूटिव्ह इंजिनीयर महेश पाटोळे, प्रोजेक्ट मॅनेजर श्री. सोनी, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय पाटणकर, कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित जाधव, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकासराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व छत्रपती शाहू आघाडीचे सर्व नगरसेवक - नगरसेविका उपस्थित होते.