+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustदिपावली उत्सवाच्या कालावधीत फेरीवाले, दुकानदारांनी पट्ट्याच्या आतच व्यवसाय करावा, अन्यथा... adjustमविआचे 85-85-85 जागांवर एकमत; मविआ 18 जागा कुणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष adjustविधानसभा निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघात आज 4 उमेदवारी अर्ज दाखल adjustसर्वात जास्त मृत्यू रस्ते अपघातामूळे, रस्ते सुरक्षेला प्राधान्य द्या : अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय रस्ते सुरक्षा समिती, अभय सप्रे adjustकोल्हापूर महानगरपालिका : देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्त्यांची तपासणी करुन अहवाल सादर न केलेने अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त व सहा.आयुक्तांना कारणे दाखवा नोटीसा adjustकोल्हापूर महानगरपालिका : कामावर वेळाने हजार झालेल्या 77 सफाई कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन व 2 आरोग्य निरिक्षक, 5 मुकादमांचे एक दिवसाचे वेतन कपात करुन कारणे दाखवा नोटीस adjustडॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव; 90 वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा adjustडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची बुटकॅम्प २०२४ स्पर्धेत चमकदार कामगिरी adjustसक्षम ॲपचा वापर करुन दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा adjustअभाविपकडून सामाजिक व सांस्कृतिक संदेश देणारी शिवमल्हार यात्रा !
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule23 Oct 24 person by visibility 217 categoryराज्य
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत आज दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात 4 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.

271 चंदगड विधानसभा मतदारसंघात 2 उमेदवारांनी 2 नामनिर्देशनपत्रे सादर केली आहेत. 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराने 1 नामनिर्देशनपत्र तर 278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराने 1 नामनिर्देशनपत्र असे एकूण 4 उमेदवारांनी 4 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. तसेच आज 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय अथवा राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाच्या किंवा सध्या विधानसभा सदस्य किंवा विधान परिषद सदस्य असलेल्या कोणत्याही उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केलेले नाही.

▪️नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांचा मतदार संघ, उमेदवाराचे नाव व पक्ष पुढील प्रमाणे-

▪️271 चंदगड : 
 शिवाजी शत्तुप्पा पाटील अपक्ष,
 संतोष आनंदा चौगुले, अपक्ष

▪️274 कोल्हापूर दक्षिण -
 संजय भिकाजी मागाडे - अपक्ष

▪️278 - हातकणंगले -
 गणेश विलास वायकर अपक्ष

या चार उमेदवारांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.