+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustदिपावली उत्सवाच्या कालावधीत फेरीवाले, दुकानदारांनी पट्ट्याच्या आतच व्यवसाय करावा, अन्यथा... adjustमविआचे 85-85-85 जागांवर एकमत; मविआ 18 जागा कुणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष adjustविधानसभा निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघात आज 4 उमेदवारी अर्ज दाखल adjustसर्वात जास्त मृत्यू रस्ते अपघातामूळे, रस्ते सुरक्षेला प्राधान्य द्या : अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय रस्ते सुरक्षा समिती, अभय सप्रे adjustकोल्हापूर महानगरपालिका : देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्त्यांची तपासणी करुन अहवाल सादर न केलेने अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त व सहा.आयुक्तांना कारणे दाखवा नोटीसा adjustकोल्हापूर महानगरपालिका : कामावर वेळाने हजार झालेल्या 77 सफाई कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन व 2 आरोग्य निरिक्षक, 5 मुकादमांचे एक दिवसाचे वेतन कपात करुन कारणे दाखवा नोटीस adjustडॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव; 90 वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा adjustडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची बुटकॅम्प २०२४ स्पर्धेत चमकदार कामगिरी adjustसक्षम ॲपचा वापर करुन दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा adjustअभाविपकडून सामाजिक व सांस्कृतिक संदेश देणारी शिवमल्हार यात्रा !
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule23 Oct 24 person by visibility 127 categoryसामाजिक
कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कोल्हापूरात शिवमल्हार यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे , राज्य विद्यापीठ कार्य राष्ट्रीय संयोजक अंबादास मेव्हणकर, शेजवळ , डमकले, सिद्धार्थ शिंदे, अमर रजपूत, स्वागत परुळेकर, कोल्हापूर महानगर मंत्री अजय इटकी व विद्यापीठ मंत्री वैभव फडतरे यांच्या हस्ते यात्रेचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले.
 
शिवराज्याभिषेक सोहळ्याची 350 वर्षपूर्ती व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. "छत्रपती श्री.शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जगाला दिलेला समरसतेचा व भारतीय संस्कृती जतनाचा संदेश समाजामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये व शैक्षणिक परिवारामध्ये रुजवण्याचा शिवमल्हार यात्रेचा उद्देश आहे, आजच्या काळात सकारात्मक विचार समाजात रुजवणे गरजेचे आहे, असे मत अंबादास मेव्हणकर यांनी प्रस्ताविकामध्ये मांडले. 

विद्यापीठाचे कुलसचिव शिंदे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराज व अहिल्यादेवी होळकर यांनी पाणी पर्यावरण शेती अर्थकारण भारतीय संस्कृती अशा अनेक सामाजिक विषयांमध्ये भरीव काम केले आहे, त्यांच्या या विचारांना सुद्धा आज समाजामध्ये पोहोचवणे आवश्यक असून यात्रेच्या निमित्ताने ते कार्य नक्कीच होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यापीठातील सर्व सन्माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य यांनी भगवा ध्वज दाखवून यात्रेला विद्यापीठातून पुढे मार्गस्थ केले.
 
शिवमल्हार यात्रा आज पासून कोल्हापूर विभागामध्ये सुरू झाली असून दिनांक 29 ऑक्टोबर पर्यंत यात्रा चालणार आहे. कोल्हापूर शहर कोल्हापूर ग्रामीण व इचलकरंजी असा यात्रेचा मार्ग असणार आहे. ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये सहाशे किलोमीटर प्रवास करणार असून जवळपास 50 महाविद्यालयांमध्ये ही यात्रा संदेश घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर समाजातील वस्ती भागांमध्ये गावांमध्ये यात्रेचे स्वागत होणार अशी माहिती यात्रेचे संयोजक ओंकार देसाई यांनी दिली.