+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustदिपावली उत्सवाच्या कालावधीत फेरीवाले, दुकानदारांनी पट्ट्याच्या आतच व्यवसाय करावा, अन्यथा... adjustमविआचे 85-85-85 जागांवर एकमत; मविआ 18 जागा कुणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष adjustविधानसभा निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघात आज 4 उमेदवारी अर्ज दाखल adjustसर्वात जास्त मृत्यू रस्ते अपघातामूळे, रस्ते सुरक्षेला प्राधान्य द्या : अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय रस्ते सुरक्षा समिती, अभय सप्रे adjustकोल्हापूर महानगरपालिका : देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्त्यांची तपासणी करुन अहवाल सादर न केलेने अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त व सहा.आयुक्तांना कारणे दाखवा नोटीसा adjustकोल्हापूर महानगरपालिका : कामावर वेळाने हजार झालेल्या 77 सफाई कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन व 2 आरोग्य निरिक्षक, 5 मुकादमांचे एक दिवसाचे वेतन कपात करुन कारणे दाखवा नोटीस adjustडॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव; 90 वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा adjustडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची बुटकॅम्प २०२४ स्पर्धेत चमकदार कामगिरी adjustसक्षम ॲपचा वापर करुन दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा adjustअभाविपकडून सामाजिक व सांस्कृतिक संदेश देणारी शिवमल्हार यात्रा !
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule23 Oct 24 person by visibility 143 categoryराज्य
मुंबई : महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये तिन्ही पक्षांचे 85-85-85 जागांवर एकमत झाले असून बाकी जागांवर मित्रपक्षांसोबत चर्चा सुरु आहे. अशी माहीती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली .या परिषदेला खासदार संजय राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, अनिल देसाई उपस्थित होते. आता मविआ 18 जागा कुणाला देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

 तिन्ही पक्षांकडून 85-85-85 या जागांवर मिळून एकूण 270 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित 18 जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरु आहेत. उद्या या जागांवर आमच्यामध्ये स्पष्टता येईल. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्रात मविआचं सरकार येईल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या यादीत 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र तिन्ही पक्षांकडून काही नावांची घोषणा करण्यात आली असली तरी त्यामध्ये बदल होतील, असे संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.