देवदर्शन करून परताना काळाचा घाला; अपघातात एकाच कुटुंबातील ४ ठार; २ जखमी
schedule01 Jan 25 person by visibility 384 categoryगुन्हे
मुंबई : सोलापूर- धुळे महामार्गावर अंबड तालुक्यातील महाकाळा येथे उभ्या ट्रकला कार धडकून हा भीषण अपघात झाला. . या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज बुधवारी एक जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला अपघात गाडीचा चक्काचूर झाला आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील कुटे व जालना येथील चौरे कुटुंबीय हे अक्कलकोट येथून देवदर्शन करून परत येत होते. ते आपल्या कारने (एमएच २० सीएस ६०४१) घरी परत येत होते. सोलापूर- धुळे महामार्गावर महाकाळा येथे आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास महामार्गावर नादुरुस्त उभ्या असलेल्या केए ३२ डी ९२८३ या ट्रकला बीडकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या चारचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार मध्ये सहा जण होते. यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातातील मृतांची नावे अनिता परशुराम कुटे (वय ४८, रा. छ. संभाजीनगर), भागवत यशवंत चौरे (वय ४७), सृष्टी भागवत चौरे (वय १३), वेदांत भागवत चौरे (वय ११, सर्व रा. अंबड रोड जालना) येथील रहिवाशी आहेत. गाडीचा चालक जखमी झाला आहे. परशुराम लक्ष्मण कुटे ५५ हे स्वतः गाडी चालवत होते छ. संभाजीनगर येथील रहिवाशी आहेत. तर छाया भागवत (वय ४०, रा. अंबड रोड, जालना) या जखमी झाल्या आहेत. मृत सर्व एकाच कुटुंबातील असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.