संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची हिवाळी परीक्षा २०२४ चा उच्चांकीत निकाल
schedule05 Feb 25 person by visibility 239 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुबंई मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२४ मध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्व विभागातून ०२ विद्यार्थांनी डिप्लोमा इंजिनिअरिंग विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत ७० पैकी ७० गुण मिळवून, महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान या ही वर्षी पटकाविला आहे, तेसेच इन्स्टिट्यूटचा ०४ विषयाचा निकाल १००% लागला आहे. या परीक्षेमध्ये सर्व विभागातील मिळून एकूण २८ विद्यार्थ्यांनी ९०% हुन अधिक टक्केवारी मिळवून यश संपादन केले आहे. अशी माहिती पॉलिटेक्निक विभागाचे अकॅडमिक डीन प्रा. आर. पी. धोंगडी यांनी दिली आहे.
तृतीय वर्षातील पॉलिटेक्निकच्या सर्व विभागातुन प्रथम क्रमांक पुजारी कविता बालकृष्णा ९४.८९%,द्वितीय क्रमांक मानाडे निर्झारा अनिल ९४.७८%, तृतीय क्रमांक शिंदे श्रावणी धनाजी ९४.११% यांनी गुण प्राप्त केले आहेत.
द्वितीय वर्षामधील सर्व विभागातुन प्रथम क्रमांक पाटील मानाली राजेंद्रा ९३.२९%, द्वितीय क्रमांक नेवागे श्रावणी मधुकर ९०.९४% व तृतीय क्रमांक खोराटे ऐश्वर्या सुर्यकांत ९०.३५.% गुण प्राप्त केले आहेत.
प्रथम वर्षातून सर्व विभागातुन प्रथम क्रमांक यादव कल्याणी सतिश ८९.७६%, द्वितीय क्रमांक घाटगे रिया सर्जेराव ८९.६५% आणि तृतीय क्रमांक पाटील कुणाल वसंत ८९.१८% गुण प्राप्त केले आहेत.
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचा निकाल उच्चांकीत लागला असून त्यामध्ये “ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी” (आयटी) प्रथम क्रमांक बाटे प्रतिक प्रकाश ७७.८०%, द्वितीय क्रमांक पाटील आदित्य अजय ७६.२०%, तृतीय क्रमांक यादव महेशकुमार बाबासो ७५.६०.% गुण प्राप्त केले आहेत. ‘डिप्लोमा इन फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी’ प्रथम क्रमांक पटेल मुश्रफ ७१.५७%, द्वितीय क्रमांक कोळेकर प्रतिक ७१.४३%, यांनी गुण प्राप्त केले आहेत अशी माहिती शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी दिले आहे.
या निकालाबद्दल संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. या सोबतच यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त करून या यशाचे सर्व श्रेय विद्यार्थी, सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व विभाग प्रमुखाना देऊन सर्वांचे मनापासून कौतुक केले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत आणि विश्वस्त, विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.