मोटर सायकल चोरणाऱ्या एक आरोपी अटक, दोन बालके ताब्यात. दोन बुलेट, दोन स्प्लेंडर मोटर सायकल जप्त
schedule04 Feb 25 person by visibility 287 categoryगुन्हे
कोल्हापूर : मोटर सायकल चोरणाऱ्या एक आरोपी अटक करून दोन बालकांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून दोन बुलेट व दोन स्प्लेंडर मोटर सायकल असा एकूण 3,40,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली .
तपास पथकामार्फत मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार महेश पाटील व महेश खोत यांना माहिती मिळाली की, दोन अल्पवयीन मुलानी बुलेट गाडी चोरली असून ते सदर गुन्ह्यातील चोरलेली बुलेट मोटर सायकल घेवून आज दि.04 फेब्रुवारी रोजी कोल्हापुर सांगली जाणारे रोडवरील हातकणंगले तालुक्यातील आतिग्रे गावचे हद्दीतील अॅक्सेल हॉटेल जवळ येणार येणार आहेत.
मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि. 04 फेब्रुवारी रोजी सापळा लावून दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना त्यांचे कब्जातील नंबर प्लेट नसलेल्या बुलेट मोटर सायकलसह ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचे कब्जात असलेली बुलेट मोटर सायकल त्यानी त्यांचा साथीदार स्वप्निल सुनिल नलावडे वय-19, रा. शाहूनगर, हातकणंगले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर याचे मदतीने चोरली असलेची कबुली दिली. त्यानंतर त्यांचेकडे सखोल तपास करुन त्यांनी चोरली आणखीन एक बुलेट व दोन स्प्लेंडर अशा 3 मोटर सायकली जप्त करुन त्यांचा साथीदार स्वप्निल सुनिल नलावडे वय-19, रा. शाहुनगर, हातकणंगले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर यास देखील ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडे-पाटील साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार संजय कुंभार, प्रशांत काबंळे, महेश खोत, महेश पाटील, विशाल चौगले, प्रदीप पाटील, लखन पाटील, सागर माने, शुभम संकपाळ, संदिप बेद्रे, विजय ईंगळे, सुशिल पाटील, राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.