SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सतर्कतेचा इशारा: गगनबावडा तालुक्यातील 'वेसरफ' तलाव १००% भरला; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशाराकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 52.34 मिमी पावसाची नोंदकोल्हापूर जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 3.15 टीएमसी पाणीसाठाजागतिक झुनोसिस दिन: मानवी आरोग्य आणि प्राण्यांचे संरक्षणयड्राव बँक उद्योजक घडविण्यात आघाडीवर : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर; यड्राव को-ऑप. बँकेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्नथायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेल्या कोपार्डे गावच्या पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सत्कार१२ वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी : डॉ. आर. के. शर्मासंभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची पूरग्रस्त भागांची पाहणी : यंत्रणेला सतर्कतेच्या सूचनाबाल संरक्षण व्यवस्थेचा सविस्तर आढावा सादर करावा : राज्य बाल हक्क संरक्षण आयोगकोल्हापुरात मुसळधार पावसाचा जोर कायम; ३३ बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पातळी ३० फुटांवर

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 3.15 टीएमसी पाणीसाठा

schedule06 Jul 26 person by visibility 129 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.15 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून  पाण्याचा विसर्ग निरंक आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी,खडक कोगे व राशिवडे,  तुळशी नदीवरील- कसबा बीड व आरे,  कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगांव, वालोली, कांटे व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, सांगरुळ, मांडुकली,  वारणा नदीवरील- कोडोली व मांगलेसावर्डे, दूधगंगा नदीवरील-  दत्तवाड व सिध्दनेर्ली, वेंदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापुर, सुरुपली, गारगोटी, म्हसवे, करडवाडी व शेणगाव, हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव व घटप्रभा नदीवरील- कानडे- सावर्डे असे एकूण 44 बंधारे पाण्याखाली आहे. 

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 3.15 टीएमसी, तुळशी 1.34 टीएमसी, वारणा 7.71 टीएमसी, दूधगंगा 3.13 टीएमसी, कासारी 1.05 टीएमसी, कडवी 1.01 टीएमसी, कुंभी 1.11 टीएमसी, पाटगाव 1.44 टीएमसी, चिकोत्रा 0.53 टीएमसी, चित्री 0.63 टीएमसी, जंगमहट्टी 0.49 टीएमसी, घटप्रभा 1.55 टीएमसी, जांबरे 0.57 टीएमसी, आंबेआहोळ 0.69 टीएमसी, सर्फनाला 0.39 टीएमसी, धामणी 1.05 व कोदे ल.पा. 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.11 फूट, सुर्वे 31 फूट, रुई 60.6 फूट, इचलकरंजी 56.8 फूट, तेरवाड 50.9 फूट, शिरोळ 40.3 फूट, नृसिंहवाडी 36 फूट, राजापूर 26.3 फूट तर नजीकच्या सांगली  12.6 फूट व अंकली 15.9 फूट अशी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes