कोल्हापूर शहरातील नाले सफाईमधून 578 टन गाळ उठाव
schedule07 Apr 25 person by visibility 168 categoryमहानगरपालिका

▪️2 पोकलँड मशीनद्वारे जयंती नाला ते गाडीअड्डा येथील नाल्यांची सफाई सुरु
कोल्हापूर : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना प्रशसाक के.मंजूलक्ष्मी यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार दि.1 मार्च 2025 पासून अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व सहा.आयुक्त कृष्णात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले. आजअखेर शहातील नाले सफाईमधून 578 टन गाळ उठाव करण्यात आला आहे.
महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 60 कर्मचा-यांमार्फत 476 लहान नाले, जेसीबीच्या सहाय्याने 236 मध्यम नाले व चॅनल सफाई करण्यात येत आहे. यामध्ये दोन जेसीबी मशीनद्वारे कनाननगर, फुलेवाडी रिंगरोड, शिवशक्ति कॉलनी, अहिल्यादेवी होळकरनगर, ठोंबरे मळा, वेटाळे मळा, कसबा बावडा, सुर्वेनगर, टाकाळा, बिरेंजेपाणद, विक्रमनबर, शास्त्रीनगर, सुभाषनगर, रामानंदनगर, कात्याणी कॉम्पलेक्स अशा 82 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे.
तर मनुष्यबळाद्वारे चंद्रेश्वर, रंकाळा स्टँण्ड, रंकाळा तलाव, सानेगुरुजी वसाहत, कसबा बावडा, शुगरमिल, फुलेवाडी रिंग रोड, कसबा बावडा पूर्व, सदरबाजार, रमणमळा, नागाळापार्क, शास्त्रीनगर, राजेंद्रनगर, नेहरुनगर, राजारामपूरी, मातंगवसाहत, दौलतनगर, यादवनगर, मंगेशकरनगर, सिध्दाळागार्डन, साळोखेनगर, क्रातीसिंह नानापाटील नगर, सूर्वेनगर व हनुमान मंदिर परिसर या 44 प्रभागातील 252 चॅनेलची सफाई पुर्ण करण्यात आली आहे.
मोठया नाल्यांची सफाई करण्यासाठी 2 पोकलँड मशीनद्वारे जयंती नाला ते गाडीअड्डा व लक्ष्मीपूरी येथील नाल्यांची सफाई सुरु करण्यात आली आहे.
तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.