कोल्हापूर : धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी
schedule07 Apr 25 person by visibility 153 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रम व जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूर व धर्मादाय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील वृध्दाश्रम, मतिमंद मुलांची शाळा, मूकबधीर मुलांची शाळा, दिव्यांग मुलांची शाळा अशा १६ ठिकाणी धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी हा आरोग्य शिबीराचा नाविण्यपूर्ण कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास धर्मादाय सह आयुक्त श्रीमती निवेदिता पवार, धर्मादाय उप आयुक्त शरद वाळके, सहायक धर्मादाय आयुक्त-१ आयुर्वेदाचार्य चंद्रमुखी गरड, प्रमुख उपस्थिती कांचनगंगा सुपाते- जाधव, डॉ. रामेश्वरी, न्यासाचे पदाधिकारी तसेच वृध्दाश्रमातील सर्व लोक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, प्रमुख उपस्थिती कांचनगंगा सुपाते- मातोश्री वृध्दाश्रम येथे या कार्यक्रमाची दिपप्रज्वलनाने सुरुवात झाली. यावर मातोश्री वृध्दाश्रमाचे अध्यक्ष पाटोळे यांनी वृध्दांच्या समस्या सांगितल्या. यानंतर आयुर्वेदाचार्य डॉ. चंद्रमुखी गरड यांनी वृध्दांनी आजारपणात घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. धर्मादाय सह आयुक्त यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, वृध्दाश्रमातील सर्वजण हे आपले आई वडीलच आहेत, आम्ही धर्मादाय कार्यालये, रुग्णालये व एनजीओ सर्वजण मिळून आपल्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहोत, याबद्दल आश्वस्त केले.
या कार्यक्रमाची संकल्पना धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती व मार्गदर्शन धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार यांचे लाभले. यावेळी वृध्दाश्रमात मोफत तपासणी शिबीर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निरीक्षक श्री. जावळे यांनी केले. अधीक्षक श्री. भुईबर, डॉ. क्षिरसागर यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले.