अब्दुललाटच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५८२ नागरिकांची तपासणी
schedule21 Nov 26 person by visibility 160 categoryआरोग्य
अब्दुललाट : ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी अब्दुललाट येथे आयोजित आरोग्य शिबिरात ५८२ नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये १९२ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर ३९० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामुळे या अभियानातील आजअखेर लाभार्थ्यांची संख्या १७ हजार २८३ वर पोहोचली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत आरोग्य व नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शनिवारी अब्दुललाट येथे झालेल्या शिबिरात १९२ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर ३९० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. एकूण ५८२ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी एस. के. पाटील, आप्पासो चौगुले, महावीर सांगावे, दादासो सांगावे, विद्याधर कुलकर्णी, डॉ. दशरथ काळे, स्वप्निल सांगावे, धन्यकुमार चौगुले, शरद काळे, प्रशांत आवळे, सौ. कस्तुरी कुरुंदवाडे, रोहन ठिकाणे, रमेश शेट्टी, पायगोंडा पाटील, महादेव तेली, वसंत कुरुंदवाडे, सुधीर सांगावे, प्रीतम पाटील, श्रीकांत चौगुले, कलाप्पा कुमटोळे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.