जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 6.85 टीएमसी पाणीसाठा
schedule22 Jul 26 person by visibility 126 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.85 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण व ठाणे आळवे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे, वेंदगंगा नदीवरील- निळपण, वाघापुर, कुरणी, बस्तवडे व सुरुपली, कुंभी नदीवरील- सांगरुळ,
दूधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण 21 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 6.85 (85 टक्के), तुळशी 2.26 (65 टक्के), वारणा 24.52 (71 टक्के), दूधगंगा 11.39 (45 टक्के), कासारी 1.85 (67 टक्के), कडवी 1.76 (70 टक्के), कुंभी 1.70 (63 टक्के), पाटगाव 2.11 (57 टक्के), चिकोत्रा 0.68 (45 टक्के), चित्री 1.46 (78 टक्के), जंगमहट्टी 0.93 (76 टक्के), घटप्रभा 1.56 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 0.99 (80 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (34 टक्के) व कोदे ल.पा. 0.21 (100 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 26.9, सुर्वे 26, रुई 56, इचलकरंजी 53.1, तेरवाड 48, शिरोळ 37.9, नृसिंहवाडी 34 तर नजीकच्या सांगली जिल्ह्यातील अंकली येथे 12.8 फूट इतकी पाणीपातळी आहे.
◼️जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.96 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 67.2 मिमी पावसाची नोंद
कोल्हापूर : जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 67.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 7.4 मिमी, शिरोळ -4.1 मिमी, पन्हाळा- 27 मिमी, शाहुवाडी- 21.5 मिमी, राधानगरी- 36 मिमी, गगनबावडा- 67.2 मिमी, करवीर- 9.9 मिमी, कागल- 15.6 मिमी, गडहिंग्लज- 20.7 मिमी, भुदरगड- 18.6 मिमी, आजरा- 23.8 मिमी, चंदगड- 23.8 मिमी, असा एकूण 22.96 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.