SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पेपर लीक प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी!डी. वाय. पाटील अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या ७२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवडसिंधुदुर्गातून ‘गोकुळ’चे एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्टदिल्लीतील विद्यार्थी लाठीमाराचा निषेध आणि अन्याय-अत्याचाराविरोधात उद्या महाराष्ट्र बंदजिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 6.85 टीएमसी पाणीसाठाराजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलन २६ जुलै रोजी; कोल्हापुरात २५ शाहू अभ्यासकांना निमंत्रणभारताचे राष्ट्रीय वैभव: बंगाल टायगरसोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; शिवाजी विद्यापीठाबाहेर इंडिया आघाडीचे आक्रमक प्रदर्शन!दिल्लीत राडा: पीएम निवासस्थानाबाहेर निदर्शनादरम्यान राहुल गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात, धक्काबुक्कीत नाकातून वाहू लागले रक्तसासने मैदानावरील अद्ययावत बॅडमिंटन हॉलचे काम ८० टक्के पूर्ण; आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केली कामाची पाहणी

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या ७२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

schedule22 Jul 26 person by visibility 125 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (ईएनटीसी) विभागातील ७२ विद्यार्थ्यांची  २६ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

विभागातील विद्यार्थिनी सबा साहिर शेख हिने टीई कनेक्टिव्हिटी या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये ८ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. लॉन्च्ड ग्लोबल या कंपनीमध्ये सर्वाधिक १६ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, इनयंत्रा टेक्नॉलॉजीज प्रा. लि. मध्ये १२ आणि  भारत फोर्ज मध्ये ७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

याशिवाय विप्रो पारी,एक्सट्रेन कॉर्प लि,  ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी), ग्लोलॉजिक्स सोल्युशन्स, प्लॅनेट स्पार्क, लुकास टीव्हीएस, अनलॉक्स ,टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स, सागर डिफेन्स, सीक्विड, वॉलस्टार टेक्नॉलॉजीज, कोरिझो एड्युटेक, फिन्युलेंट सोल्युशन्स, हाय५एआय, एलव्हीडी-मल्टीफोल्ड प्रायव्हेट लिमिटेड यांसह अनेक प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी उद्योगाभिमुख अभ्यासक्रमासोबतच तांत्रिक प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, ग्रुप डिस्कशन आणि मॉक इंटरव्ह्यूचे नियमित प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांना अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा.डॉ.टी.बी. मोहिते-पाटील , प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम,  प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes