7 वी राज्यस्तरीय बेसबॉल लिटल लीग स्पर्धा 2025 : पुणे विजेता, कोल्हापूरला उपविजेतेपद
schedule18 Mar 25 person by visibility 287 categoryक्रीडा

कोल्हापूर : दहिवडी सातारा या ठिकाणी आयोजित 7 वी राज्यस्तरीय बेसबॉल लिटल लीग स्पर्धेत महाराष्ट्रातील 16 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला उपांत्य सामन्यांमध्ये सातारा विरुद्ध कोल्हापूर अशी लढत झाली या लढतीमध्ये कोल्हापूर संघाने सातारा संघावर 3:10 रन्सनी विजेतेपद पटकावले अंतिम सामन्यांमध्ये पुणे कोल्हापूर अशी लढत झाली या लढतीमध्ये पुणे संघाने कोल्हापूर संघावर मात करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
कोल्हापूर संघाने या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले कोल्हापूर जिल्हा संघामध्ये शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूलचे खेळाडू जय कंभार,सर्मथ जाधव,विनीत चौगुले,दिपक दाखवे,राधेय घाटगे,मयुर हस्वले,श्रेयश माने,स्वराज सागर,चिन्मय चोकाकर,आदिती पुरेकर, सिध्दी वडर,उन्नती पाटील या खेळाडूंना शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.वृषाली कुलकर्णी उपमुख्याध्यापक मा.पी.आर.मोरे,प्रवेक्षक मा.एस.पी.पाटील,ज्येष्ठ शिक्षक राजेश वरक,अनिल चव्हाण ,तसेच क्रीडा शिक्षिका सौ.इंद्रायणी पाटील, देविदास महाले यांचे प्रोत्साहन लाभले.
या संघास क्रीडा शिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. राजेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.