SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा

schedule11 Jul 26 person by visibility 99 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून  पाण्याचा विसर्ग निरंक आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे व राशिवडे,  कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण,  कुंभी नदीवरील- सांगरुळ, वारणा नदीवरील- कोडोली, दूधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड व बाचणी, वेंदगंगा नदीवरील- सुरुपली असे एकूण 21 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.36 टीएमसी, तुळशी 3.47 टीएमसी, वारणा 34.40 टीएमसी, दूधगंगा 25.39 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.72 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.54 टीएमसी, जांबरे 0.30 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.67 टीएमसी, धामणी 3.85 व कोदे ल.पा. 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 27 फूट, सुर्वे 26.6 फूट, रुई 60.3 फूट, इचलकरंजी 58.8 फूट, तेरवाड 53.6 फूट, शिरोळ 47.6 फूट, नृसिंहवाडी 44.6 फूट, राजापूर 34.11 फूट तर नजीकच्या सांगली  12.11 फूट व अंकली 19.8 फूट अशी आहे.

◼️जिल्ह्यात पावसाची उघडीप
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाने उघडीप दिली असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 1.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 0.1 मिमी, शिरोळ -0.0 मिमी, पन्हाळा- 0.6 मिमी, शाहुवाडी- 0.4 मिमी, राधानगरी- 0.1 मिमी, गगनबावडा- 1.3 मिमी, करवीर- 0.3 मिमी, कागल- 0.1 मिमी, गडहिंग्लज- 0.0 मिमी, भुदरगड- 0.2 मिमी, आजरा- 0.0 मिमी, चंदगड- 0.8 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes