SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

पावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंती

schedule11 Jul 26 person by visibility 331 categoryसामाजिक

कोल्हापूर: 'जय भवानी... जय शिवराय...'च्या अखंड जयघोषात आणि ऐतिहासिक वातावरणात शिवराष्ट्र परिवार आयोजित पन्हाळगड–पावनखिंड प्रेरणायात्रेला अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास अनुभवण्यासाठी आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी वारशाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून ५०० हून अधिक शिवभक्त या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

मोहिमेच्या सुरुवातीला वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशिद यांच्या पुतळ्यांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मोहिमेचे नेतृत्व राजेंद्र पोवार आणि भूपाल शेळके करत आहेत. दरम्यान, खोतवाडी येथील मुक्कामाच्या ठिकाणी शिवव्याख्याते दीपकराव करपे यांनी पन्हाळगड-पावनखिंड रणसंग्रामाचा इतिहास अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवला. त्यांच्या ओघवत्या शैलीतील व्याख्यानामुळे शिवभक्तांना जणू काही आपण शिवकाळातच आहोत, असा अनुभव आला.

शिवप्रेम आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेला सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पदभ्रमंती आणि व्याख्यानांच्या माध्यमातून शौर्य, त्याग व स्वराज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न ठरला आहे. या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी झाल्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने दुमदुमून गेला असून, शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes