SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​"मुस्लिम ओबीसी आरक्षणाचे जनक हाजी शब्बीर अन्सारी यांना कोल्हापुरात भावपूर्ण श्रद्धांजली"उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसइतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढकोल्हापुरात ११ एप्रिलपासून 'भीम फेस्टिव्हल'चा जागर; डिगे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सन्मान'डिजिटल महाराष्ट्र' संकल्पनेचे कोल्हापूर मॉडेल!बाजीराव पेशव्यांची दिल्लीवर धडक: जेव्हा मराठ्यांच्या घोड्यांनी यमुनेचे पाणी प्यायले!राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहनकडोलीत अवैध गुटख्यावर 'सर्जिकल स्ट्राईक'!इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात ; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे : आ . राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

कोल्हापुरात ११ एप्रिलपासून 'भीम फेस्टिव्हल'चा जागर; डिगे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

schedule28 Mar 26 person by visibility 106 categoryराज्य

कोल्हापूर : क्रांतिबा फुले यांची १९९ वी जयंती आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात भव्य 'भीम फेस्टिव्हल' चे आयोजन करण्यात आले आहे. कालकथित माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत हा महोत्सव पार पडणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवार, दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता बिंदू चौक येथे माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाची सुरुवात होईल. सायंकाळी ६:१५ वाजता आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन होईल. यावेळी एल.आय.सी.च्या सौजन्याने उभारलेल्या LED भव्य संसद भवन प्रतिकृतीचे उद्घाटन आमदार छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सोमवार, दि. १३ एप्रिल रोजी शाहू स्मारक भवन येथे 'धम्मरक्षिता' आणि 'समाजरत्न भीमक्रांती' पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाईल. यामध्ये समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व पुरुषांचा गौरव केला जाणार आहे. याच दिवशी रात्री १२ वाजता बिंदू चौक येथे भव्य प्रबोधनात्मक आतषबाजीने महामानवांना अभिवादन करण्यात येईल.

१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सकाळी संस्था कार्यालयात अभिवादन कार्यक्रम होईल, तर दुपारी १२ वाजता अंध व अपंग मुलांना भोजनदान करून सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे.

 या संपूर्ण भीम फेस्टिव्हलमध्ये ९०% महिलांचा सक्रिय सहभाग असणार आहे, जे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरेल.

या महोत्सवात आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, राजेश लाटकर यांसह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या सर्व प्रबोधनात्मक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सदानंद डिगे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes