मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११ कसबा बावडा येथे नवागतांचे स्वागत
schedule17 Jun 25 person by visibility 270 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा कोल्हापूर येथे इयत्ता पहिली मध्ये नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण व गणवेश वाटप कार्यक्रम प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संपर्क अधिकारी राजेंद्र आपुगडे उपस्थित होते.
इयत्ता पहिलीच्या मुलांचे औक्षण करून , त्यांना गुलाबाची फुले देऊन, पेढे देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल संस्मरणीय बनवण्यासाठी शाळेतील सहाय्यक शिक्षक सरिता अमित पोटकुले यांच्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेण्यात आले व विद्यार्थ्यांना त्याचे सप्रेम भेट देण्यात आली. आज इयत्ता पहिलीचे 100 टक्के विद्यार्थी उपस्थित होते.
100 दिवस कृती आराखडा संस्कार शिबिर अंतर्गत जीवन मूल्यांवर आधारित माजी मुख्याध्यापक पोवार सर यांचे व्याख्यान मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाले.
▪️एक पेड माँ के नाम
या उपक्रमांतर्गत प्राध्यापक संजय रूपे देवचंद कॉलेज निपाणी यांच्या मातोश्री ताराबाई रूपे यांचे नावाने मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
▪️विशेष स्वागत व शुभेच्छा
भागातील प्रतिष्ठित नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण प्रेमी नागरिक यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना शैक्षणिक वर्ष सन 2025 /26 साठी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी रमेश सुतार , अनुराधा गायकवाड (अध्यक्ष, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ,व सर्व सदस्य
मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील, शाळेतील सर्व शिक्षक ,सेवक ,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.