SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कागल तालुक्यात गोबरगॅसच्या खड्डयात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यूराज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या; मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावामनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११ कसबा बावडा येथे नवागतांचे स्वागतविकसित कृषी संकल्प अभियानातर्गत ९० गावातील १८ हजार शेतकऱ्यांशी संवाद; डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रमार्फत मार्गदर्शनआषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणसार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन आढळल्यास दंड, 23 जून रोजी विशेष मोहीमकोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची 23 जून रोजी सभाअभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेविषयी शनिवारी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनारराज कपूर यांच्या स्मृती दिनानिमित्त कराओके गाण्यातून वाहिली श्रदांजली मुस्लीम समाजातील मुलींनी संशोधन क्षेत्रात भरारी घ्यावी : गणी आजरेकर

जाहिरात

 

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

schedule17 Jun 25 person by visibility 227 categoryसामाजिक

🟨 मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

 मुंबई : श्री विठ्ठल - रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले.

यंदाच्या आषाढी एकादशी दिवशी रविवार, दि. ६ जुलै, २०२५ रोजी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येईल. या महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज-औसेकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री  फडणवीस यांची वर्षा निवासस्थान येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची तसेच अन्य व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes