SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सैनिक टाकळी एमआयडीसीचा विरोध खरा, की यड्रावकरांना घेरण्याचा डाव? मार्केट कमिटीच्या बैठकीनंतर शिरोळ तालुक्यात जोरदार चर्चाकोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल : माजी सरन्यायाधीश भूषण आर. गवईअभियंत्यांनी नोकरी शोधणारे नाही, तर नोकऱ्या देणारे व्हावे " राज्यपाल जिष्णु देव वर्मासांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार यड्रावकर यांचा निर्णायक पाठपुरावासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात स्वच्छता व वर्कशॉप कर्मचाऱ्यांचा सत्कारसंगीताच्या सुरावटीत घामाचा सन्मान! 'संगीतसूर्य'च्या नूतनीकरणाच्या मंचावर स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रांगडा कलाविष्कारकोल्हापूर : कपडे आणायला गेलेल्या पत्नीचा निर्घृण खून; नराधम पतीने १० वर्षांचा संसार संपवला!सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेदुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसलेक लाडकी योजनेचा लाभ आता अधिक सुलभ : लेक लाडकी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार : आदिती तटकरे

जाहिरात

 

सैनिक टाकळी एमआयडीसीचा विरोध खरा, की यड्रावकरांना घेरण्याचा डाव? मार्केट कमिटीच्या बैठकीनंतर शिरोळ तालुक्यात जोरदार चर्चा

schedule16 Aug 26 person by visibility 134 categoryउद्योग

शिरोळ : सैनिक टाकळी येथे प्रस्तावित शासकीय एमआयडीसीच्या मुद्द्यावरून शनिवारी शिरोळ तालुक्यात राजकीय विरोध पाहायला मिळाला. एमआयडीसीला विरोध असल्याचे सांगत तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. मात्र, त्यानंतर रत्नपाण्णा कुंभार मार्केट यार्ड येथे झालेल्या बैठकीत आंदोलकांच्या पेक्षा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना वारंवार विरोध करणारे राजकीय पुढारी बैठकीत उपस्थित असल्याने या आंदोलनाला राजकीय वळण मिळाल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. त्यामुळे हा विरोध प्रस्तावित एमआयडीसीला आहे की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आहे ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या संदर्भात चर्चेच्या उद्देशाने मार्केट यार्ड येथे शनिवारी दुपारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची उपस्थिती होती. मात्र, एमआयडीसीला विरोध करणाऱ्या सैनिक टाकळीतील स्थानिक नागरिकांची संख्या बोटावर मोजण्याइतपत होती, त्याउलट आमदार यड्रावकर यांना सातत्याने विरोध करणारे काही राजकीय चेहरे अधिक ठळकपणे उपस्थित होते.

सैनिक टाकळी येथे एमआयडीसी झाल्यास स्थानिक युवकांना रोजगार, महिलांसाठी उद्योगाच्या संधी आणि परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे विकासाच्या प्रकल्पाला विरोध करण्याऐवजी नागरिकांच्या शंकांचे निरसन करून सकारात्मक मार्ग काढण्याची भूमिका आमदार यड्रावकर यांच्याकडून वारंवार मांडली जात आहे.

दरम्यान, एमआयडीसीच्या नावाखाली सुरू असलेल्या आंदोलनामागे स्थानिकांचा खरा प्रश्न किती आणि राजकीय विरोध किती ?  याबाबत तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes