SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
एसआयआर अभियान राष्ट्रहितासाठी अत्यंत महत्त्वाचे; प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा : भगवानदास सबनानीडॉक्टर्स डे निमित्त कोल्हापुरात आरोग्यदायी उपक्रम: 'भाजप' आणि 'भागीरथी'च्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!गोकुळसाठी राष्ट्रवादीकडून अखेरच्या मूदतीपर्यंत एकूण १९७६ ठराव दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदानशिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंतीपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूपुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनाडीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची झेन्सार कंपनीत वार्षिक १० लाख पॅकेजवरती निवड​"अभिवादन हरितक्रांतीच्या प्रणेत्यांना.....!"कोल्हापूर हादरले: भोगावतीत बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; ४ जणांना अटक

जाहिरात

 

गोकुळसाठी राष्ट्रवादीकडून अखेरच्या मूदतीपर्यंत एकूण १९७६ ठराव दाखल

schedule01 Jul 26 person by visibility 190 categoryउद्योग

◼️राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची माहिती
     
कोल्हापूर : गोकुळ दूध संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आज बुधवार दि. एक म्हणजेच अखेरच्या मदतीपर्यंत एकूण १९७६ ठराव दाखल केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांनी ही माहिती दिली. ठरावसंखेच्या या उच्चांकी आकड्याबद्दल  आसुर्लेकर- पाटील यांनी ठराव धारकांसह राष्ट्रवादीची नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी,  पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
        
याबाबत अधिक माहिती अशी, ठराव दाखल करण्याच्या अगदीच प्राथमिक टप्प्यात म्हणजेच बुधवार दि. २४ जून २०२६ अखेर  परस्पर आलेल्या ठरावांची संख्या ६१८ होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शक्ती प्रदर्शनाने गुरुवारी दि. २५ रोजी १७४३ ठराव दाखल केले. सोमवारी दि. २९ रोजी १०१ व मंगळवार दि. ३० रोजी १११ ठराव दाखल केले. तसेच; अखेरची मुदत असलेल्या बुधवार दि. 1 जुलै रोजी २१ ठराव दाखल केले. या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकूण १९७६  ठरावांचा उच्चांकी टप्पा यशस्वीरित्या पार केल्याचेही श्री. पाटील यांनी निवेदनात म्हंटले आहे.
       
[सोबत: तालुकानिहाय सविस्तर तक्ता....]

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes