SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूपुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनाडीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची झेन्सार कंपनीत वार्षिक १० लाख पॅकेजवरती निवड​"अभिवादन हरितक्रांतीच्या प्रणेत्यांना.....!"कोल्हापूर हादरले: भोगावतीत बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; ४ जणांना अटकहसणे हीच सर्वोत्तम औषधी: आंतरराष्ट्रीय विनोद दिन!सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नव्हे, तर समाजासाठी नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात : कॉ. डॉ. भारत पाटणकरसंजय घोडावत फाउंडेशनकडून एचआयव्हीग्रस्तांना मदत१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनारकेशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाला वेग: रंगकर्मींच्या अटी मान्य, कोल्हापूर महापालिकेचा सकारात्मक निर्णय!

जाहिरात

 

​"अभिवादन हरितक्रांतीच्या प्रणेत्यांना.....!"

schedule01 Jul 26 person by visibility 154 categoryसामाजिक

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले.  महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील त्यांची अतुलनीय योगदान लक्षात घेऊन, एक जुलै हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाकडून 'कृषी दिन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.
     
यावेळी मंत्री  मुश्रीफ  म्हणाले, स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे महाराष्ट्राच्या हरितक्रांती आणि कृषी क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. १९७२ च्या भीषण दुष्काळात त्यांनी राज्यात अन्नधान्य टंचाईवर मात करण्यासाठी 'हरित क्रांती' ची पायाभरणी केली. आधुनिक शेती, सिंचन प्रकल्प आणि बियाण्यांच्या संशोधनाला प्राधान्य दिले. त्यामुळे महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.

 महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची यशस्वी अंमलबजावणी केली. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार देण्यासाठी त्यांनी 'रोजगार हमी योजना' सुरू केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes