'आप'चे अर्जवाटप उद्यापासून
schedule17 Dec 25 person by visibility 90 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे. आम आदमी पार्टीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आप कडून लढण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज वाटप 18 व 19 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर 20 व 21 रोजी इच्छुकांच्या मुलाखती पार पडतील.
शहराच्या विकासासाठी काम करू इच्छिणाऱ्यांनी आप कार्यालय, उद्यमनगर येथे संपर्क साधावा असे आवाहन आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संदीप देसाई व शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले आहे.





