SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर, कोल्हापूरच्या खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय स्तरावर कामगिरीशिवाजी विद्यापीठात गुरूवारी पर्यावरण शिक्षकांसाठी कार्यशाळाडीकेटीईमध्ये न्यूरल स्ट्रीम ऑटोमेशनची अत्याधुनिक संशोधन प्रायोजित प्रयोगशाळा सुरुशूरवीरांच्या देशसेवेचा जिल्ह्याला अभिमान – जिल्हाधिकारी अमोल येडगेदिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना येत्या शुक्रवारी प्रारंभतंबाखूमुक्त युवा अभियान 3.0 ची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणे जनजागृतीसंजय घोडावत विद्यापीठात नाना पाटेकर यांची भेट विद्यार्थ्यांसोबत साधणार संवाद"कलासक्त" परिवाराच्या वतीने दि ग्रेट शो मॅन राज कपूर यांची 101 वी जयंती निमित्त अभिवादनसरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर व ॲस्टर आधार हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करारसुनीलकुमार सरनाईक यांचे निधन

जाहिरात

 

डीकेटीईमध्ये न्यूरल स्ट्रीम ऑटोमेशनची अत्याधुनिक संशोधन प्रायोजित प्रयोगशाळा सुरु

schedule16 Dec 25 person by visibility 93 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये संगणक अभियांत्रिकी विभागात न्यूरल स्ट्रीम ऑटोमेशन या अघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक संशोधन प्रायोजित प्रयोगशाळेची भव्य व प्रेरणादायी सुरवात करण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा उद्योग शिक्षण समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण ठरणार आहे.या प्रयोगशाळेच्या माध्यमातून कुशल तंत्रज्ञान निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून डीकेटीईमध्ये शिक्षणघेत असणा-या विद्यार्थ्यांना संशोधनासाठीही याचा मोठा लाभ होणार आहे अनेक जागतिक पातळीवर कंपन्याच्या प्रयोगशाळा व संशोधन केंद्र डीकेटीईमध्ये असून त्यामध्ये ही अणखी एक महत्वपूर्ण भर पडली आहे.
न्यूरल स्ट्रीम ऑटोमेशन ही रोबोटीक प्रोसेस अ‍ॅटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून, अर्टिफिशिएल इंटेलिजन्स(ए.आय.) व मशिन लर्निंग व एजेंटीक ए.आय. यांच्या सहायाने नाविण्यपूर्ण व प्रभावी तंत्रज्ञान उपाय प्रदान करते. संस्थेचे न्यूरल फलो स्टुडिओ हे नो-कोड रोबोटीक प्रोसेस अ‍ॅटोमेशन विकासासाठीचे आधुनिक व्यासपीठ असून, न्यूरो व्हिजन ही एआय आधारित व्हिजन प्रणाली आरोग्यसेवा,दूरसंचार तसेच विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना होवून त्या संदर्भात कुशल तंत्रज्ञ आवश्यक असून ती उपलब्ध करण्याची संधी या प्रयोगशाळेद्वारे उपलब्ध होणार आहे.

या महत्वपूर्ण उदयोग शैक्षणिक सहकार्यामुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणाचा अनुभव, कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षण, संशोधनवृत्तीला चालना आणि उद्योगाभिमूख प्रकल्पांवर काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांची तांत्रिक क्षमता, नवोपक्रमशीलता व रोजगारक्षम कौशल्ये अधिक बळकट होवून ते जागतिक स्तरावर स्पर्धात्मक अभियंते म्हणून घडतील.
प्रयोगशाळेचे उद्घाटन डीकेटीईचे कार्यकारी संचालक रवी आवाडे व न्यूरल स्ट्रीमचे विजय घाडगे, राजू तेरवाडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना विजय घाडगे व राजू तेरवाडकर यांनी अभियांत्रिकी शिक्षण पध्दतीमध्ये कशा पध्दतीचे उपक्रम राबविले जावेत याच्या विषयी मार्गदर्शन केले व हे नविन तंत्रज्ञान अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यास योग्य ते मार्गदर्शन केले तसेच संस्थेमध्ये असणा-या अदयायवत अत्याधुनिक यंत्रसामुग्रींनी युक्त अशा लॅब व वर्कशॉप यांची माहिती घेवून त्यांनी डीकेटीईचे विशेष कौतुक केले.
डीकेटीईमध्ये नाविन्य, संशोधन आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणसंस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबददल संस्थेतर्फे न्यूरल स्ट्रीम ऑटोमेशन चे आभार मानले. लॅब मिळविण्यासाठी सीएसई विभागप्रमुख डॉ. डी. व्ही. कोदवडे यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी त्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त,संचालिका डॉ. एल.एस.अडमुठे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास डीन डॉ एस.के.शिरगांवे, विभागप्रमुख डॉ टी.आय.बागबान, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes