विद्यार्थ्यांना त्रास देणे थांबवा, अन्यथा सीजेपी करेल मोठे आंदोलन"; अभिजीत दीपके यांचा अल्टीमेटम
schedule28 Jul 26 person by visibility 506 categoryदेश
नवी दिल्ली : पोलिसांकडून विद्यार्थ्यांना आणि निदर्शकांना त्रास देण्याचा सिलसिला सुरूच राहिल्यास कॉकरोच जनता पार्टी (CJP) तर्फे लवकरच एक मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी दिला आहे.
यापूर्वी सीजेपीच्या प्रवक्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून आंदोलनकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच सरकारने दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.
याच मुद्द्यावर भर देत अभिजीत दीपके यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकारने विद्यार्थ्यांना लक्ष करणे आणि त्यांना विनाकारण त्रास देणे त्वरित थांबवले पाहिजे.
जर पोलिसांकडून हा त्रास असाच सुरू राहिला, तर कॉकरोच जनता पार्टी (CJP) एका मोठ्या आणि शांततापूर्ण आंदोलनाद्वारे या दडपशाहीला आणि पोलीस कारवाईला सडेतोड उत्तर देईल.