SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभकोलोली येथील महिला खुनाचा गूढ उकलला; अतिप्रसंगाला प्रतिकार केल्यानेच केली होती हत्या, स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक!करवीर तालुक्यात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची पेन्शन रखडली; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तहसीलदारांना निवेदनराष्ट्रवादीतील ‘पेल्यातील वादळ’ पेल्यातच शमले; 'गोकुळ' आणि साखर कारखानदारीच्या प्रश्नांवर मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य!टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी महत्त्वाची बातमी: वाहन नोंदणीसाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ!वसई-विरारमध्ये शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखांशिवाय अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपा युवा मोर्चात जाहीर प्रवेश!आधुनिक भारताचे शिल्पकार: पंडित जवाहरलाल नेहरूगणेशोत्सवात कोल्हापूरकरांना मिळणार वातानुकूलित ई-बसेसची भेट; परिवहन सभापती सत्यजित जाधव यांची माहितीजिल्ह्यात खत विक्रीसाठी ऑनलाईन बुकिंग प्रणाली लागू‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम सुरु; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

जाहिरात

 

कोलोली येथील महिला खुनाचा गूढ उकलला; अतिप्रसंगाला प्रतिकार केल्यानेच केली होती हत्या, स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक!

schedule27 May 26 person by visibility 145 categoryगुन्हे

कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे एका शेतात झालेल्या ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला  यश आले आहे. छबुताई सर्जेराव पाटील असे मयत महिलेचे नाव असून, अतिप्रसंगाचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या रागातून गावातीलच एका ५१ वर्षीय नराधमाने त्यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस पथकाने आरोपी अंकुश हणमंत पाटील (रा. कोलोली) याला अटक केली आहे.

ही घटना २४ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास कोलोली येथील मासुलकी नावाच्या शेतात घडली होती. छबुताई शेतात काम करत असताना अज्ञात इसमाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले होते. याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडलेले ठिकाण गावापासून दुर्गम आणि शेतात असल्याने पोलिसांसमोर या खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान होते.


गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

 पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली आणि तांत्रिक पुरावे तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयित अंकुश पाटील याला ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून त्याची कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. छबुताई यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी दिलेल्या तीव्र प्रतिकारामुळे त्याने धारदार शस्त्राने डोक्यावर व हातावर वार करून त्यांची हत्या केल्याचे आरोपीने मान्य केले. आरोपी अंकुश पाटील याला पुढील तपासासाठी पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

ही कामगिरी पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने फत्ते केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes