SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विनापरवाना रुग्णालय, सोनोग्राफी मशीन व गर्भपात प्रकरणी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्यावर कारवाईभारतातील पहिली 'स्किन बँक': सायन रुग्णालयाची ऐतिहासिक व वैद्यकीय क्रांतीभाजप उद्योग आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण; उद्योगवृद्धीसाठी प्रभावी काम करण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहनकालसुसंगत अभ्यासक्रम ,शैक्षणिक गुणवत्तेची हमी; विद्यार्थ्यांची केआयटीला प्रथम पसंतीसेंद्रिय खत, ठिबक सिंचन आणि योग्य लागण हीच उत्पादनवाढीची गुरुकिल्ली : डॉ. संजीव मानेमतदार यादीत नाव कायम राहील याची मतदारांनी खात्री करून घ्या : मतदार नोंदणी अधिकारी मोसमी चौगुलेलोकशाही दिनी 17 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशएस.टी. महामंडळाच्या सवलतीच्या पाससाठी गावागावात कॅम्प आयोजित करा; करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुळकुड दुर्घटनेतील मृत शर्विलच्या घरी मंत्री हसन मुश्रीफ यांचे सांत्वन; फाऊंडेशनकडून ५१ हजारांची आर्थिक मदत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विश्वात्मक दृष्टीचे प्रगल्भ विचारवंत: डॉ. श्रीपाल सबनीस

जाहिरात

 

विनापरवाना रुग्णालय, सोनोग्राफी मशीन व गर्भपात प्रकरणी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्यावर कारवाई

schedule04 Aug 26 person by visibility 88 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरात गर्भलिंग निदान करून बेकायदेशीररीत्या गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांना छाप्यात पकडण्यात आले आहे.  महानगरपालिकेच्या नोंदीनुसार, डॉ. गायकवाड यांनी सन २०२० मध्ये कदमवाडी रोड येथील प्रतिमा हॉस्पिटलची नर्सिंग होम ॲक्टअंतर्गत नोंदणी केली होती. या नोंदणीची मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपुष्टात आली होती. त्यानंतर परवान्याचे नूतनीकरण न केल्याने महानगरपालिकेने त्यांना नोटीस बजावली होती.

  यावेळी डॉ.चंद्रकांत गायकवाड यांनी रुग्णालय बंद असल्याचे लेखी स्वरूपात लिहून दिले आणि तेथे रहात होते. त्यानंतर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी केली असता तेथे कोणताही रुग्ण दाखल नसल्याचे, तपासणी विभाग बंद असल्याचे, रुग्णालयात बेड किंवा कर्मचारी कार्यरत नसल्याचे तसेच बाह्यरुग्ण व आंतररुग्ण नोंदवहीत कोणत्याही रुग्णांच्या नोंदी नसल्याचे आढळून आले. या अहवालाच्या आधारे रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यात आली होती. सध्या संबंधित ठिकाणी आढळून आलेले सोनोग्राफी मशीन हे पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत नसल्याचे तसेच गर्भपात केंद्र चालविण्यासाठी आवश्यक परवानाही घेतला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणाचा तपास सध्या पोलिस यंत्रणेमार्फत सुरू असून तपासाअंती विनापरवाना रुग्णालय चालविणे, विनापरवाना सोनोग्राफी मशीन बाळगणे तसेच आवश्यक नोंदणी व परवान्याविना गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्याविरुद्ध आरोग्य विभागामार्फत नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes