SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची मागणीगर्भलिंग निदान प्रकरणी डॉक्टरविरुद्ध कारवाई; वैद्यकीय नोंदणी निलंबनाची शिफारस‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजनकेडीसीसी बँकेकडे ११,१९८ शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे रु. ७४ कोटी जमापवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याचे आवाहनथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायीनी तर केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भावनाराष्ट्रीय हातमाग दिन: भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा आणि अभिमानकोरे फार्मसीच्या बी. फार्म अभ्यासक्रमास 'अ' मानांकनउंचगाव, सरनोबतवाडी परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी उभारा; शिवसेना आक्रमक!कोरे आर्किटेक्चरमध्ये आधुनिक थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

जाहिरात

 

गर्भलिंग निदान प्रकरणी डॉक्टरविरुद्ध कारवाई; वैद्यकीय नोंदणी निलंबनाची शिफारस

schedule07 Aug 26 person by visibility 178 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरालगतच्या कळंबे तर्फ ठाणे हद्दीतील एका लॉजमध्ये गर्भलिंग निदान होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने संबंधित लॉजवर छापा टाकून संबंधितांना ताब्यात घेतले. या प्रकरणाच्या चौकशीत कोल्हापूर शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड यांचे नाव निष्पन्न झाले.

आरोग्य विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने डॉ. गायकवाड यांच्या नोंदणीविना सुरू असलेल्या प्रतिमा हॉस्पिटलची तपासणी केली. या तपासणीदरम्यान रुग्णालयात एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आढळून आले. तसेच पोलिसांच्या चौकशीत डॉ. गायकवाड यांनी गर्भपात केल्याची कबुली दिल्याचे करवीर पोलीस ठाण्याकडून कळविण्यात आले आहे. संबंधित रुग्णालयाची नोंदणी सन २०२० ते ३१ मार्च २०२३ अखेर वैध होती.

या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ९१, ३१९(२), ३(५), महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम १९६१ चे कलम ३३, महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियमातील कलम ३, ६, १२ तसेच गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (PCPNDT) कायद्यातील कलम ५, १८, २३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तपासणीदरम्यान गर्भपात केंद्राचा परवाना नसताना एमटीपी कायद्याचे उल्लंघन करून गर्भपात करणे, पीसीपीएनडीटी कायद्यान्वये आवश्यक नोंदणी नसताना सोनोग्राफी मशीन जवळ बाळगणे तसेच रुग्णालयाची आवश्यक नोंदणी व नूतनीकरण नसताना वैद्यकीय सेवा देणे, या बाबी निदर्शनास आल्या आहेत. या संदर्भात सक्षम प्राधिकरणामार्फत आवश्यक प्रशासकीय व फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

   सदर प्रकरण वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिकतेच्या व व्यावसायिक आचारसंहितेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडेही स्वतंत्र चौकशीची शिफारस करण्यात आली आहे. उपलब्ध अभिलेख, एफआयआर, तपासणी अहवाल व इतर पुरावे विचारात घेऊन संबंधित डॉक्टरांच्या वैद्यकीय नोंदणीचे तात्पुरते निलंबन अथवा चौकशीअंती दोष सिद्ध झाल्यास नोंदणी रद्द करण्याबाबत नियमानुसार योग्य तो निर्णय घेण्याची शिफारस कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत... महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निबंधकांकडे करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes