SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची मागणीगर्भलिंग निदान प्रकरणी डॉक्टरविरुद्ध कारवाई; वैद्यकीय नोंदणी निलंबनाची शिफारस‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजनकेडीसीसी बँकेकडे ११,१९८ शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे रु. ७४ कोटी जमापवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याचे आवाहनथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायीनी तर केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भावनाराष्ट्रीय हातमाग दिन: भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा आणि अभिमानकोरे फार्मसीच्या बी. फार्म अभ्यासक्रमास 'अ' मानांकनउंचगाव, सरनोबतवाडी परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी उभारा; शिवसेना आक्रमक!कोरे आर्किटेक्चरमध्ये आधुनिक थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

जाहिरात

 

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी

schedule07 Aug 26 person by visibility 110 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या विषयाकडे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. 

सध्या एनडीए परीक्षेची केंद्रे मुंबई, ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि आसपासच्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना, शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. परिणामी आर्थिक खर्च, वेळ आणि मानसिक ताण अशा अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी एनडीए परीक्षेचे केंद्र कोल्हापूरमध्ये सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
या मागणीसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन, खासदार महाडिक यांनी निवेदन सादर केले. 

कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून, कोल्हापुरातही एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू व्हावे,  या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली. जर कोल्हापूरमध्ये एनडीए परीक्षा केंद्र मंजूर झाले, तर हजारो विद्यार्थ्यांचा प्रवासाचा त्रास कमी होईल, आर्थिक भार हलका होईल आणि अधिकाधिक युवकांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याच्या दिशेने संधी मिळेल, ही बाब खासदार महाडिक यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांसमोर मांडली. यावर केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes