SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ग्रंथोत्सवात जास्तीत जास्त प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांनी सहभागी व्हावे : जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकरडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवडअण्णाभाऊ साठे समाज मंदिराचे काम पूर्ण करा : 'आप'ची मागणी सीपीआर मध्ये नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या समाज माध्यमावरील पोस्ट, बातमीवर विश्वास ठेऊ नका : जिल्हाधिकारी अमोल येडगे‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदानमाध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे : उपमुख्यमंत्री अजित पवारराष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करु नये : निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेलीसीपीआर मधील नोकरीसाठी कोणत्याही अमिषाला बळी पडू नका : अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांचे आवाहनतृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्र मिळवण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा :जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहनडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट टेबल टेनिस स्पर्धेत अजिंक्य

जाहिरात

 

आजाराच्या मुळापर्यंत जाण्यासाठी ऍक्युपंक्चर उपचार पध्दती उपयुक्त : सुमिता सातारकर; रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनतर्फे व्याख्यान

schedule21 Sep 24 person by visibility 345 categoryआरोग्य

कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्रात कितीही नवनवीन तंत्रज्ञान आणि औषधोपचार पध्दती आल्या असल्या तरी त्यातून, आजाराचे अचूक निदान होण्यासाठी वेळ जातो. मात्र ऍक्युपंक्चर उपचार पध्दती आजाराच्या मुळाशी जात असल्याने ही उपचारपध्दती आजही विश्‍वासार्ह ठरलीय, असे प्रतिपादन ऍक्युपंक्चर स्पेशालिस्ट सुमिता सातारकर यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने आयोजित ऍक्युपंक्चर-एक प्रभावी उपचार पध्दती, या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, ही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. अरुंधती महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्यावतीने विविध सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जात आहेत.

 याअतर्ंगत हॉटेल वृषाली येथे पुण्यातील स्वास्थ्य-संतुलन मेडिकेअर कंपनीच्या संचालिका आणि ऍक्युपंक्चर स्पेशालिस्ट सुमिता सातारकर यांचे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने ऍक्युपंक्चर, एक प्रभावी उपचार पध्दती या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी बोलताना, सातारकर यांनी ऍक्युपंक्चर उपचार पध्दतीचे सविस्तर विवेचन केले. ही एक भारतीय प्राचीन उपचार पध्दती असून, १९७० च्या दशकात डॉ. कोटणीस यांनी ही उपचार पध्दती रुजवली. तर राज्य शासनाने या उपचार पध्दतीला वैद्यक शास्त्र म्हणून, ७ वर्षांपूर्वी मान्यता दिली आहे. सध्याचे ताण-तणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळं अऩेक नवनवे आजार उद्भवत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कितीही प्रगती झाली तरी, आजाराच्या अचूक निदानाविषयी साशंकता असते. याचबरोबर मानवी भाव-भावनांचा परिणामही शरीरावर होतो. गेल्या १५ वर्षात हे प्रमाण अधिकच वाढले आहे. अशा स्थितीत ऍक्युपंक्चर उपचार पध्दती वरदान ठरत आहे. ही एक प्रभावी उपचार पध्दती असून, आजाराच्या मुळाशी जाण्यास ही उपचार पध्दती उपयुक्त ठरते. याचबरोबर या उपचार पध्दतीचे कोणतेही साईड इफेक्ट नसल्याने तसेच वेदनारहित उपचार पध्दती असल्याने ती एक सुरक्षित उपचार पध्दती मानली जाते. त्यामुळे विविध आजारांनी त्रस्त असणार्‍या रुग्णांनी ऍक्युपंक्चर उपचार पध्दतीचा स्वीकार करावा, असे आवाहन सुमिता सातारकर यांनी केले.

 यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ऑगस्टमधील वृत्त पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. जागतिक ओझोन दिनाच्या निमित्ताने संस्थेच्यावतीने ऑनलाईन प्रश्‍नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. 

या स्पर्धेत वि. स. खांडेकर प्रशालेचे विद्यार्थी मृण्मयी सरवदे, प्रणोती मोरे, अनंत सणगर, वैष्णवी शेलार, श्रीहान स्वामी यांनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्यासह शिक्षिका सोनाली महाजन, रेश्मा आरवाडे यांचा सत्कार सौ. अरुंधती महाडिक आणि सुमिता सातारकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बी. एस. शिंपुकडे, करुणाकर नायक, भारती नायक, रमेश खटावकर, विजयालक्ष्मी सणबर्गी, डॉ. मीरा कुलकर्णी, उत्कर्षा पाटील, सचिन लाड, विकास राऊत, अनुपमा खटावकर, गौरी शिरगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरचे सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये गीता कदम, सौम्या कदम, अर्चना चौगले, सुवर्णा गांधी, नेत्रा कुरबेट्टी यांचा समावेश होता.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes