परदेश शिष्यवृत्तीसाठी 24 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत
schedule16 Oct 25 person by visibility 80 categoryराज्य

कोल्हापूर : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून केंद्र सरकार पुरस्कृत National Overseas Scholarship for SC etc. Candidates या परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2025-26 या वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.nosmsje.gov.in या संकेतस्थळावरुन 24 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले.
ही योजना भारत सरकारची असून अनुसूचित जाती, भटक्या व अर्धभटक्या जमाती, भूमिहीन शेतीमजूर आणि पारंपरिक कारागीर या घटकांतील अल्पउत्पन्न विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येते. या योजनेमुळे पात्र विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदविका किंवा पीएच.डी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य मिळते.
पात्रता निकष पुढीलप्रमाणे- संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत आणि पीएच.डी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक. परदेशातील शिक्षणसंस्था QS World University Ranking नुसार पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये असावी. अर्जदाराचे वय 35 वर्षांपेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी www.nosmsje.gov.in या केंद्र शासनाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी,
असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.