शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटबाँल स्पर्धत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास विजेतेपद
schedule16 Oct 25 person by visibility 89 categoryक्रीडा

वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयाने बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटबाँल स्पर्धत विजेतेपद पटकाविले, अंतिम सामन्यात विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर चा पराभव करीत विजेतेपद मिळविले.
संघामध्ये पुर्वा भोसले, मनस्वी मोरे, निर्झरा पाटील जाधव, श्रावणी भोसले, अनन्या संदे, देवयानी पाटील, वृषाली निकम, आर्या पाटील, प्रेरणा पाटील, सलोनी पाटील, भक्ती पाटील, साक्षी पाटील या खेळाडूंचा समावेश होता.
या यशाबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिनी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. क्रीडा प्रशिक्षक उदय पाटील व श्री प्रितेश पाटील यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.